अमेरिकेत अज्ञातांनी मशिदीच्या प्रवेशद्वाराला आग लावली

पुरोगामी आणि विज्ञानवादी असणार्‍या अमेरिकेतही अशा घटना का घडतात, याचा भारतातील पुरो(अधो)गामी कधी विचार करतील का ?

ह्यूस्टन (अमेरिका) – अमेरिकेतील नॉर्थशोअर परिसरातील ‘इसा इब्न मरयम’ मशिदीच्या प्रवेशद्वाराला अज्ञातांनी २० जुलैला पहाटे आग लावली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अज्ञातांनी मशिदीतील मौलवींच्या गाड्यांचीही हानी केली. या घटनेतील आरोपींविषयी माहिती देणार्‍यास अमेरिका सरकारने ५ सहस्र डॉलर्सचे (३ लाख  ४३ सहस्र रुपयांचे) पारितोषिक घोषित केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF