दूध आंदोलनाला सरकार उत्तरदायी ! – राज ठाकरे

पुणे – सरकारकडून दूधप्रश्‍नाविषयी आधीच बैठक बोलवायला हवी होती.  राज्य सरकारमधील लोक सांगकामे आहेत. बाहेरच्या राज्यातील ‘अमूल’ वगैरे दूध उत्पादकांना महाराष्ट्रात घुसवण्याचे प्रयत्न चालू आहेत. शेतकर्‍यांना त्यांच्या मालाचा भाव मिळाला पाहिजे. दूध आंदोलनाला सरकार उत्तरदायी आहे, असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.

समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याच्या संदर्भात ‘पुतळ्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारके आणि किल्ले यांवर व्यय करायला हवा’, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. ‘राममंदिर झाले पाहिजे; पण ते निवडणुकीचा विषय म्हणून नव्हे. चार वर्षांमध्ये काहीच काम न झाल्याने भगवद्गीता वाटप, राममंदिर आदी विषय चालू आहेत’, असा आरोपही त्यांनी केला. ‘नीट’च्या परीक्षेत मराठी विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF