राजीव गांधी यांचा अवमान केलेल्या मालिकेवर बंदी घालण्यासाठी देहली उच्च न्यायालयात याचिका

(चित्र सौजन्य : रिपब्लिक टीवी)

नवी देहली – ‘सेक्रेड गेम्स’ या ‘नेटफ्लिक्स वेब सिरीज’मधील (संकेतस्थळांवरील मालिका) काही दृश्यांत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह आशय आहे, त्यामुळे ते काढावेत, अशी मागणी करणारी याचिका देहली उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. दोन सदस्यीय खंडपिठाकडे ही सुनावणी असतांना त्यातील एका न्यायाधीशाने कोणतेही कारण न देता या सुनावणीतून माघार घेतली आहे.

१. कोलकात्यातील गिरीश पार्क पोलीस ठाण्यात या संदर्भात काँग्रेसचे कार्यकर्ते राजीव सिन्हा यांनी तक्रार केली आहे. (काँग्रेसचे हिंदु कार्यकर्ते कधी हिंदु देवतांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार करतात का ? – संपादक) पोलिसांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणी आरोपांची चौकशी करत आहोत.

२. ‘सेक्रेड गेम्स’ या मालिकेत अभिनेते सैफ अली खान, नवाझउद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री राधिका आपटे यांच्या भूमिका आहेत. यात मुंबईतील एका आतंकवादी आक्रमणाचा कट उधळणार्‍या पोलीस अधिकार्‍याची कथा आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now