शनिशिंगणापूर येथील देवस्थानच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करा; अन्यथा शनिदेवाचाच नव्हे; हिंदूंचाही कोप होईल !

कोपरगाव (जिल्हा नाशिक) आणि चोपडा (जिल्हा जळगाव) येथे समस्त हिंदुत्वनिष्ठांची मागणी

कोपरगाव (जिल्हा नाशिक) – स्वतःला हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेणार्‍या महाराष्ट्र शासनाने शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्‍वर देवस्थानचे सरकारीकरण करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीही महाराष्ट्र शासनाने अनक मंदिरे कह्यात घेतली. या सर्व मंदिरांचे सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली सरकारीकरण केले गेले. प्रत्यक्षात मात्र या मंदिरांच्या व्यवस्थापनात शासकीय समित्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून देवनिधीवर कोट्यवधींचा डल्ला मारला. देवनिधी लुटणार्‍या पापी व्यक्तींना शिक्षा न देणार्‍या सरकारला श्री शनैश्‍वर देवस्थान कह्यात घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. सरकारने श्री शनैश्‍वर देवस्थानचे सरकारीकरण तात्काळ रहित करावे आणि मंदिर पुन्हा भक्तांच्या कह्यात द्यावे. सरकारने कह्यात घेतलेल्या मंदिरांतील देवनिधी लुटणार्‍यांवर अद्याप कारवाई का केली नाही, त्या भ्रष्टाचार्‍यांना मोकाट का सोडले आहे, याची उत्तरे द्यावीत; अन्यथा सरकारवर श्री शनिदेवच नाही, तर हिंदूंचाही कोप होईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवाजी उगले यांनी येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात केले.

या वेळी निवासी नायब तहसीलदार श्री. शिवाजी सुसरे यांना निवेदन देण्यात आले. वारकरी संप्रदायाचे रत्नाकर जंगम, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवाजी उगले, योग वेदांत सेवा समितीचे श्री. अशोक सोनसळेसर, सनातन संस्थेचे श्री. दिलीप सारंगधर, रणरागिणी शाखेच्या वैशाली कातकडे, सनातन प्रभातचे वाचक आणि अनेक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

  • अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळेही सरकार का कह्यात घेत नाही ? – ह.भ.प. प्रसाद महाराज बागुल

  • चोपडा येथेही राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

चोपडा, १३ जुलै (वार्ता.) – हिंदूंची मंदिरे म्हणजे चैतन्याचा स्रोत आहेत. व्यवस्थापनाच्या नावाखाली सरकार मंदिरे कह्यात घेत आहे. यात मात्र दानपेटी, गायी, चारा यांचे घोटाळे होत आहेत. देवनिधीवर लक्ष ठेवूनच हे कृत्य केले जात आहे. हिंदूंच्या मंदिरांसमवेतच अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळेही सरकार का कह्यात घेत नाही ?, असा संतप्त प्रश्‍न ह.भ.प. प्रसाद महाराज बागुल यांनी ११ जुलैला येथील तहसील कार्यालय येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात केला.

या वेळी वारकरी संप्रदाय, स्वराज्य निर्माण सेना, स्वाध्याय परिवार, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था या संघटना, तसेच ह.भ.प. प्रसाद महाराज बागुल, बालाजी मंदिराचे पंडित अलोक महाराज, श्री. रविंद्र जोशी महाराज, स्वराज्य निर्माण सेनेचे श्री. राहुल माळी, स्वाध्याय परिवाराच्या सौ. वत्सलाबाई चौधरी, तसेच श्री. राहुल महाजन, श्री. नितीन महाजन, श्री. सोपान महाजन आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. चोपड्याचे तहसीलदार श्री. दीपक गिरासे यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

‘हज हाऊस’ला हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या टीपू सुलतानचे नाव देऊन त्याचे उदात्तीकरण करणारा निर्णय कर्नाटक शासनाने रहित करावा, ही मागणीही आंदोलनांत करण्यात आली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now