बांगलादेशामध्ये अज्ञातांकडून कालीमातेच्या मूर्तीची तोडफोड

बांगलादेशातील हिंदूंच्या या स्थितीविषयी भारतातील भाजप सरकार कधी बोलणार ?

SRI SRI RADHA KRISHNA & SRI SRI KALI (TARA) MAA Gournadi Barisal Bangladesh.

ढाका – बांगलादेशातील बारिसाल जिल्ह्यात असलेल्या गौरनदी या गावातील श्री तारामातेच्या मंदिरात ८ जुलैच्या रात्री अज्ञातांनी कालीमातेच्या मूर्तीची तोडफोड केली. मंदिराचे पुजारीश्री. कृष्णा चक्रवर्ती यांना ९ जुलैला सकाळी हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी त्वरित गौरनदी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला; मात्र पोलिसांना अद्याप आरोपींचा शोध घेण्यात यश आलेले नाही.

या प्रकरणी ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांनी ‘संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलिसांशी संपर्क करून या प्रकरणाची त्वरित चौकशी करावी आणि गुन्हेगारांना अटक करावी’, अशी मागणी केली. तसेच देशात आतापर्यंत तोडफोड झालेल्या मूर्ती आणि मंदिरे पूर्ववत् करून देण्याची मागणी केली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now