(म्हणे) ‘भारतातील हिंदुत्वाचा अतिरेक आतंकवादाकडे जात आहे !’

  • तोंड आहे म्हणून बोलणारे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह !
  • ओसामा बिन लादेन याला ‘ओसामाजी’ म्हणणार्‍या दिग्विजय सिंह यांना हिंदुत्वावर टीका करण्याचा काय अधिकार ?
  • जर हिंदुत्व आतंकवादाकडे जात असते, तर दिग्विजय सिंह यांची असे बोलण्याचे धाडस झाले असते का ?

भोपाळ (मध्यप्रदेश) – पाकचे माजी सैन्यदल प्रमुख झिया-उल-हक यांच्यामुळे पाकिस्तानमध्ये आतंकवाद वाढीला लागला. अगदी असेच उदाहरण भारतातही पहायला मिळते आहे. देशात हिंदुत्वाचा अतिरेक होत आहे, ही गोष्ट देशासाठी घातक असून त्याला केंद्र सरकार उत्तरदायी आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केला.


Multi Language |Offline reading | PDF