तुळजापूर मंदिरातील भ्रष्टाचाराचा अहवाल उघड करण्यासाठी मी लक्ष घालतो ! – डॉ. रणजीत पाटील, गृहराज्यमंत्री

मंदिरात होणार्‍या भ्रष्टाचारावर सरकारने स्वतः लक्ष घालणे आवश्यक !

(मध्यभागी) गृहराज्यमंत्री श्री. रणजीपाटील यांना निवेदन देतांना श्री. अरविंद  पानसरे आणि श्री. अजय संभूस (उजवीकडे)

नागपूर – तुळजापूर मंदिरातील भ्रष्टाचाराच्या संदर्भात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचा अहवाल अजून का उघड केला जात नाही, यामध्ये मी लक्ष घालतो, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी १२ जुलैला येथे केले. विधानभवनात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे आणि श्री. अजय संभूस यांनी डॉ. पाटील यांची भेट घेऊन तुळजापूर मंदिरातील भ्रष्टाचार आणि संथ गतीने चालू असलेले अन्वेषण यांकडे त्यांचे लक्ष वेधले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी श्री. अरविंद पानसरे यांनी ‘मंदिरांचे सरकारीकरण झाल्यापासून तेथे पूर्वीपेक्षा अधिक भ्रष्टाचार वाढला आहे’, याची माहिती दिली. डॉ. पाटील यांनी ‘कुठे आणि कसा भ्रष्टाचार झाला आहे’, त्याची माहिती विचारली. तेव्हा श्री. पानसरे यांनी शिर्डी देवस्थानातील ६२ लक्ष रुपयांच्या घोटाळ्याविषयी अवगत केले, तसेच शिर्डीत कुंभमेळ्यासाठी साहित्य खरेदी केले आहे, असे कागदपत्रांद्वारे दाखवण्यात आले आहे. ‘तुळजापूर मंदिराच्या मालकीच्या शेकडो एकर भूमींचा हिशोब लागत नाही’, असेही श्री. पानसरे यांनी सांगितले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now