हिंदु देवतांच्या विडंबनाच्या विरोधात कायदा होण्यासाठी संसदेत आवाज उठवीन ! – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना

(उजवीकडे) खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना निवेदन देतांना श्री. अरविंद पानसरे

नागपूर – समाजात हिंदु देवतांचे मोठ्या प्रमाणावर विडंबन होणे, ही गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे देवतांच्या विडंबनाचा विषय संसदेत उपस्थित करून देवतांचे विडंबन करणार्‍यांना कठोर शिक्षा होण्यासाठी कायदा केला जावा, अशी मागणी मी करीन, असे आश्‍वासन शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी येथे १२ जुलैला दिले. येथील विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे आणि श्री. अजय संभूस यांनी डॉ. शिंदे यांची भेट घेऊन त्यांना हिंदु देवतांचे विडंबन होत असल्याविषयीची संपूर्ण माहिती दिली. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी श्री. अरविंद पानसरे यांनी खासदार डॉ. शिंदे यांना सनातन प्रभातचा ‘मंदिर वाचवा, संस्कृती वाचवा’ हा विशेषांक भेट स्वरूपात दिला, तसेच ‘सरकारीकरण झालेल्या देवस्थानांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार कसा होतो’, या संदर्भातील पुरावे डॉ. शिंदे यांना दाखवले. याविषयी डॉ. शिंदे म्हणाले, ‘‘खरे तर देवाचा पैसा धर्मकार्यासाठी वापरला जावा; मात्र भ्रष्टाचारी लोक देवाचा पैसाही सोडत नाहीत, हे सर्व क्लेशदायक आहे.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now