परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘पूर्वीच्या युगांत हिंदू ‘कृण्वन्तो विश्वम् आर्यम् ।’, म्हणजे ‘अखिल विश्व सुसंस्कृत करू’ असा, म्हणजे सर्व विश्वाचा विचार करायचे. संत ज्ञानेश्वर महाराजांनीही म्हटले आहे, ‘हे विश्वचि माझे घर ।’ याउलट आजच्या कलियुगात हिंदूंना जगभरच नाही, तर भारतातही अत्याचार होणारे हिंदू आपले वाटत नाहीत. त्यांना हिंदु धर्मापेक्षा जात महत्त्वाची वाटते ! त्यामुळे हिंदूंची आणि भारताची प्रत्येक क्षेत्रात परमावधीची अधोगती झाली आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले