ठाणे येथील गायक श्री. प्रदीप चिटणीस यांनी रुग्ण-साधकांवर केलेल्या संगीतप्रयोगांचे सूक्ष्म परीक्षण

‘२.७.२०१८ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने रामनाथी आश्रमात गायक श्री. प्रदीप चिटणीस यांनी रुग्ण-साधकांवर शास्त्रीय गायनाचे प्रयोग केले. या प्रयोगांचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे देत आहे.

श्री. राम होनप
श्री. प्रदीप चिटणीस

१. राग – गुर्जरी तोडी

१ अ. रागातील स्वरांचा श्रोत्यांवरील परिणाम

२. स्वरांच्या गायनाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचा श्रोत्यांवर होणारा परिणाम

२ अ. श्री. चिटणीसकाका यांचे स्वर रुग्णांच्या शरिराला प्रथम विश्‍वासात घेत असणे

२ आ. त्यानंतर स्वर रुग्णांच्या शरिराशी संवाद साधून त्यांचे दुःख समजून घेत असणे

२ इ. त्यानंतर स्वर आपले कार्य करण्यासाठी रुग्ण-साधकांच्या कुंडलिनी चक्रांवर कार्य करू लागणे

२ ई. स्वरांद्वारे वरील प्रक्रिया घडण्यामागील कारण : श्री. चिटणीसकाका यांना रुग्णांविषयी आपलेपणा आणि प्रेम आहे. त्यांना ‘रुग्ण लवकर त्रासातून मुक्त व्हावे’, असे वाटत असते. त्यामुळे काकांच्या या आंतरिक प्रेमाचे परिणाम स्वरांवर होतात आणि ते स्वर त्या पद्धतीने कार्य करू लागतात.

२ उ. स्वरांचा रुग्णांच्या कुंडलिनी चक्रांवर होणारा परिणाम : श्री. चिटणीसकाका यांनी गायलेेले काही स्वर रुग्णांच्या स्वाधिष्ठान, काही स्वर मणिपूर आणि काही स्वर अनाहत चक्रांची शुद्धी करण्याचे कार्य करत होते. स्वरांतील शक्तीमुळे कुंडलिनी चक्रांची शुद्धी झाल्याने त्या त्या चक्रांशी संबंधित पंचतत्त्वांचे कार्य सुधारू लागते, उदा. कुणात अग्नीतत्त्व अल्प असल्यामुळे भूक मंदावण्याचा त्रास होतो. अशा वेळी स्वरांनी शरिरातील अग्नीतत्त्व हळूहळू वाढू लागते. त्यामुळे शरिरातील पंचतत्त्वांचा समतोल राखला जातो. परिणामी रुग्णाच्या शारीरिक अडचणी न्यून होऊन त्यांना चांगले आरोग्य लाभण्यास साहाय्य होते.

३. मन सकारात्मक होण्यासाठी घेतलेल्या प्रयोगात मोठ्या वाईट शक्तींनी श्री. चिटणीस यांचा उपहास करणे

श्री. चिटणीस यांनी उपस्थितांचे मन शांत आणि सकारात्मक होण्यासाठी एक प्रयोग घेतला. त्यात श्री. चिटणीस म्हणाले, ‘‘आता आपण निसर्गात जाऊ या !’’, त्या वेळी सूक्ष्मातील एक वाईट शक्ती अन्य वाईट शक्तींना म्हणाली, ‘याला (श्री. चिटणीस यांना) निसर्गात धोपटून काढूया !’

त्यानंतर श्री. चिटणीस निसर्गाचे वर्णन करतांना म्हणाले, ‘‘येथे पुष्कळ हिरवेगार गवत असून झाडांना फळे आणि फुले आहेत’’, हे ऐकून एक वाईट शक्ती चेष्टेने म्हणाली, ‘येथे (जंगलात) एक गुहादेखील आहे. त्यात आम्ही (वाईट शक्ती) आहोत.’

४. प.पू. गजानन महाराज यांचा ‘गण गण गणात बोते ।’ हा मंत्र ऐकवणे

या जपाचे कार्य काही प्रमाणात बीजमंत्रांप्रमाणे होते.

श्री. चिटणीस यांचा प.पू. गजानन महाराज यांच्याप्रती भाव असल्याने या मंत्रांतून प्रकट होणार्‍या सात्त्विक लहरी रुग्ण-साधकांच्या शरिरातील अशुद्धी सहजतेने बाहेर काढण्यात साहाय्य करत होत्या.

४ अ. स्वर म्हणण्याच्या पद्धतीचा सूक्ष्मातील परिणाम : श्री. चिटणीस यांनी या मंत्रांत अनेक चढ-उतार साकार केले होते. या मंत्रांतील दोन स्वर ताणून म्हटले आणि त्या पुढील स्वर वेगाने म्हटला. या पद्धतीमुळे धनुष्याला लावलेला बाण आधी मागे घेऊन तो पुढे सोडला जातो, त्याप्रमाणे मंत्रांतील शक्ती वेगाने कार्यरत झाल्याचे जाणवले. यावरून ‘विविध स्वर म्हणण्याच्या पद्धतीने सूक्ष्मातून किती प्रभावी कार्य होत असते ?’, हे लक्षात आले.

४ आ. उच्च पट्टीत स्वर गाणे : स्वरांतून बाहेर पडणार्‍या लहरी अधिक गतीमान होतात.

५. स्वरांतून होणारे वैशिष्ट्यपूर्ण कार्य

अ. प.पू. गजानन महाराज यांच्या मंत्रातील स्वराने वातावरणात पांढर्‍या रंगाच्या बिंदूसारख्या, तर कधी कधी तुटक ईश्‍वरी लहरी रुग्ण-साधकांच्या दिशेने प्रक्षेपित होऊन शरिरातील रोग-जंतूंचा प्रभाव न्यून करत होत्या. अशा लहरींतून ‘शरीर शुद्धी’चे कार्य घडते.

आ. काही स्वर जोर देऊन म्हटल्यावर स्वरांतील शक्तीमुळे रुग्णांतील रोगजंतूंची शक्ती न्यून होत होती.

इ. ‘नी रे रे सा’, हे स्वर रुग्णांच्या शरिरातील आपतत्त्वाचा समतोल राखण्यास साहाय्य करत होते.

ई. काही स्वरांमुळे रुग्णांचे शरीर आणि मन यांना शांती लाभत होती.

६. भक्तीगीत – ‘अब मोरी नैया करो पार’

अ. या गीतातील स्वरांची रचना आध्यात्मिकदृष्ट्या पुष्कळ परिणामकारक होती.

आ. या गीतांतील ओळीनंतर श्री. चिटणीस विविध स्वरांच्या रचना गात होते. तेव्हा त्यातून पुष्कळ प्रमाणात ईश्‍वरी शक्ती निर्माण होत होती. ‘तिचा परिणाम स्वतःवर होऊ नये’, यासाठी वाईट शक्तींनी साधकांभोवती पांढर्‍या रंगाचे कवच निर्माण केले होते. त्यामुळे स्वरांतील ईश्‍वरी शक्ती साधकांपर्यंत पोहोचत नव्हती.

७. स्वर द्रुत गतीत गाण्याचे महत्त्व

श्री. चिटणीस यांनी गीताच्या शेवटी स्वररचना वेगाने गाण्यास प्रारंभ केली, तेव्हा वाईट शक्तींनी स्वरांचा परिणाम होऊ नये, यासाठी साधकांभोवती केलेले कवच फुटले आणि स्वरांतील शक्ती साधकांवर परिणाम करू लागली.

८. संधिवात असलेल्या रुग्ण साधकांवर ‘शुद्ध सारंग’ रागाचा प्रयोग

या वेळी श्री. चिटणीस यांनी ‘शुद्ध सारंग’ हा राग गायला. त्यांनी या रागातून शरिरातील उष्ण आणि थंड ऊर्जेचा समतोल राखला जात असल्याचे सांगितले.

८ अ. या रागाचा सूक्ष्मातील परिणाम : हा राग गातांना श्री. चिटणीस यांच्या मुखातून स्वर बाहेर पडताच काही अंतरावर वातावरणात एक अग्नीचा (अग्नीतत्त्वाचा) आणि एक पाण्याचा (आपतत्त्वाचा) गोल आकार सिद्ध झाला. त्यानंतर अनुक्रमे अग्नी आणि आपतत्त्व यांच्या गोलातून त्या त्या तत्त्वाचे छोटे छोटे कण सिद्ध होऊन ते रुग्ण-साधकांच्या दिशेने जात होते. यामुळे आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा रुग्ण साधकांना प्राप्त होत होती.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.७.२०१८)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now