शुक्रवार, १३.७.२०१८, निज ज्येष्ठ अमावास्या या दिवशी होणार्‍या खंडग्रास सूर्यग्रहणाविषयीची माहिती

सौ. प्राजक्ता जोशी

१. खंडग्रास सूर्यग्रहण दिसणारे आणि न दिसणारे प्रदेश

‘शुक्रवार, निज ज्येष्ठ अमावास्या (१३.७.२०१८) या दिवशी खंडग्रास सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने भारतातील व्यक्तींनी ग्रहणाचे वेधादी कोणतेही नियम पाळू नयेत. हे ग्रहण ऑस्ट्रेलियाचे दक्षिण टोक, न्यूझीलंडचे पश्‍चिम टोक आणि हिंदी महासागर येथे दिसणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार या ग्रहणाच्या वेळा पुढीलप्रमाणे आहेत.

१ अ. आरंभ : सकाळी ७.१८

१ आ. मध्य : सकाळी ८.३१

१ इ. समाप्ती : सकाळी ९.४४

२. खग्रास आणि खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय ?

सूर्य या तार्‍याभोवती फिरणार्‍या पृथ्वी या ग्रहाभोवती तिचा चंद्र हा उपग्रहही फिरत असतो. या सर्वांची भ्रमण प्रतले (कक्षा किंवा वर्तुळे) वेगवेगळी आहेत. फिरता-फिरता सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येऊन त्याची सावली पृथ्वीवर पडते. ती ज्या भागात पडते, तेथून तेवढा काळ चंद्रबिंबामुळे सूर्यबिंब झाकल्यासारखे दिसते. सूर्यबिंब पूर्णपणे दिसेनासे झाले, तर खग्रास सूर्यग्रहण आणि सूर्यबिंब अर्धवट झाकले गेले, तर खंडग्रास सूर्यग्रहण होते.

(संदर्भ : दाते पंचांग)’

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद), महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, ज्योतिष विभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.६.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now