साधकांनो, आषाढी एकादशीच्या निमित्ताने लावण्यात येणार्‍या ग्रंथप्रदर्शनातून सनातनची ग्रंथसंपदा सर्वदूर पोहोचवा !

साधकांना सूचना

(सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ

‘२३.७.२०१८ या दिवशी आषाढी एकादशी आहे. त्या निमित्ताने ग्रंथ, ध्वनीचकत्या आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी गुरुकृपेमुळे लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेल्या सनातनच्या प्रसारसाहित्याचे अधिकाधिक वितरण करावे.

१. पुढील ग्रंथ अन् लघुग्रंथ यांचे वितरण करावे !

१ अ. ग्रंथ

१. पूजेपूर्वीची वैयक्तिक सिद्धता

२. पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र

३. सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र

४. शक्ति (भाग १ आणि २)

५. अलंकारशास्त्र

६. स्त्रियांच्या अलंकारांमागील शास्त्र (बिंदीपासून कर्णभूषणांपर्यंतचे अलंकार)

७. सात्त्विक रांगोळ्या – भाग १

१ आ. लघुग्रंथ

१. शक्ति (अध्यात्मशास्त्रीय ज्ञान)

२. देवीपूजनाचे शास्त्र

३. श्रीकृष्ण (अध्यात्मशास्त्रीय ज्ञान)

४. आरती कशी करावी ?

५. नमस्काराच्या योग्य पद्धती

६. देवघर आणि पूजेतील उपकरणे

७. प्रार्थना

८. स्त्रियांनी अलंकार घालण्यामागील शास्त्र

९. सात्त्विक रांगोळ्या

वरील ग्रंथ आणि लघुग्रंथ यांची सूची उदाहरणादाखल दिली आहे. जिज्ञासूंसाठी अन्य सर्व ग्रंथही प्रदर्शनात उपलब्ध करावेत.

२. मराठी भाषेतील ध्वनीचकत्या

आरतीसंग्रह – श्री गणेश आणि दत्त यांच्या नामजपासह, तसेच शिव आणि श्री दुर्गादेवीसह अन्य देवी यांचे नामजप आणि उपासनाशास्त्र

३. देवतांच्या नामजप-पट्ट्या

विविध देवतांच्या नामजपाच्या पट्ट्या, तसेच वास्तूची शुद्धी करण्यासाठी उपयुक्त असे वास्तूछत

४. देवतांची सात्त्विक चित्रे

श्रीकृष्ण, गणपति, दत्त, श्री दुर्गादेवी यांची लहान, मध्यम आणि मोठ्या आकारांतील फ्रेमसहीत चित्रे

वरील ग्रंथ, उत्पादने आदींचे प्रदर्शन आयोजित करून प्रदर्शनस्थळी ग्रंथांची माहिती देणारे फ्लेक्स लावू शकतो. साधक आणि वाचक यांनी उपरोल्लेखित प्रसारसाहित्य स्थानिक वितरकांकडून घ्यावे. वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी उपरोल्लेखित ग्रंथ आणि अन्य प्रसारसाहित्य यांची मागणी स्थानिक वितरकांकडे किंवा ९३२२३१५३१७ या संपर्क क्रमांकावर अथवा sanatanshop.com या संकेतस्थळाला भेट देऊन करू शकतात.’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.६.२०१८)

सनातनचा ग्रंथसागर जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा !

अखिल विश्‍वात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची पायाभरणी करण्यासाठी आणि जिज्ञासूंना धर्माचरणी बनवण्यासाठी सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचा मोलाचा वाटा असणार आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन लावतांना अधिकाधिक जणांपर्यंत ग्रंथ पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रदर्शनस्थळी अधिकाधिक ग्रंथ प्रदर्शित (डिस्प्ले) केले जातील, असे पहावे. जागेअभावी काही ग्रंथ प्रदर्शित करणे शक्य नसेल, तर ग्रंथांची माहिती विशद करणारी ग्रंथसूची प्रदर्शनात ठेवावी. शक्य असल्यास नवीन प्रकाशित झालेल्या ग्रंथांची वेगळी मांडणी करू शकतो.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now