श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या संपत्तीचे संग्रहालय करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाला त्रावणकोर राजघराण्याचा विरोध

हिंदूंच्या मंदिरांच्या संपत्तीचे काय करायचे, हे ठरवण्याचा केंद्र सरकारला काय अधिकार ? ते कधी चर्च आणि मशीद यांच्या संपत्तीविषयी बोलते का ?

थिरूवनंतपुरम् – केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील अब्जावधी रुपयांचा खजिना प्रदर्शनासाठी खुला करण्याच्या सूचनेला त्रावणकोरच्या राजघराण्याने विरोध दर्शवला आहे. एकेकाळी या मंदिराची मालकी त्रावणकोर राजघराण्याकडे होती. राजघराण्याचे आदित्य वर्मा यांनी मंदिरातील सुवर्णालंकारांच्या ‘थ्रीडी’ प्रतिमा मंदिर परिसरात दाखवण्यात याव्यात आणि त्यासाठी मंदिराच्या मुख्य पुजार्‍यांची अनुमती घ्यावी, असे सुचवले आहे. वर्मा यांनी सांगितले की, केंद्रीय पर्यटनमंत्री अल्फॉन्स कन्नानथाम आणि राज्यमंत्री कडकमपल्ली सुरेंद्रन् यांनी श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील संपत्तीचे संग्रहालय उभारण्याचा प्रस्ताव राजघराण्यासमोर नुकताच ठेवला होता.

‘God’s ornaments not for display’, Travancore royal family opposes museum for Padmanabhaswamy temple riches

मंदिराची परंपरा आणि भाविकांची भावना दुखावून याविषयी निर्णय घेता येणार नाही. मंदिराबाहेर सुवर्णालंकार नेल्यास त्याच्या सुरक्षेची निश्‍चिती कोण देणार ? मंदिराची संपत्ती आणि इतर प्रकरणांचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने आभूषणे मंदिरातून इतरत्र नेण्याच्या प्रस्तावावर कोणीही निर्णय घेऊ शकत नाही.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now