बांगलादेशमध्ये १० वर्षीय हिंदु मुलाची धर्मांधांकडून निर्घृण हत्या

‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’कडून कठोर कारवाईची मागणी

बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदु असुरक्षित ! जिथे भारतातील हिंदूंचे सरकार आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना रक्षण करू शकत नाही, तिथे बांगलादेशमधील हिंदूंचे रक्षण कसे होणार ? सर्वत्रच्या हिंदूंचे रक्षण होण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही !

ढाका – बांगलादेशमध्ये काही धर्मांधांनी १० वर्षीय हिंदु मुलाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ने केली आहे.

१. बांगलादेशच्या नारायणगंज जिल्ह्यातील रूपगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत महंमद शाहीन, महंमद आलमगीर आणि आनिक या तीन धर्मांधांनी १० वर्षीय हिंदु मुलाचे अपहरण केले. नंतर त्याच्या वडिलांकडे मुलाच्या सुटकेसाठी ५ लाख रुपये खंडणी मागितली: मात्र गरीब पालकांना निर्धारित वेळेत एवढी मोठी रक्कम देणे शक्य झाले नाही. त्यामुळे अपहरणकर्त्या धर्मांधांनी अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या केली आणि त्याचा मृतदेह त्याच्या घरापासून थोड्या अंतरावर फेकून दिला.

२. मुलाच्या वडिलांनी रूपंगज पोलीस ठाण्यात मुलाची अपहरण करून हत्या केल्याच्या प्रकरणी तक्रार दाखली केली. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आरोपींनी हत्या केल्याचे स्वीकारल्याचे पोलिसांनी सांगितले.

३. ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांनी त्यांच्या काही सहकार्‍यांसह रूपगंज पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा केली. तसेच त्यांनी साक्षीदारांशी चर्चा केली. पीडित मुलाच्या पालकांना भेटून न्यायालयात खटला लढवण्यासाठी साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले. या प्रकरणी गुन्हेगारांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अधिवक्ता घोष यांनी केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF