देव आहे, हे सिद्ध केल्यास मी त्यागपत्र देईन ! – फिलिपिन्सचे अध्यक्ष रोड्रीगो दुतेर्ते यांचे कॅथोलिक ख्रिस्त्यांना आव्हान

मनीला (फिलिपिन्स) – देव आहे, यामागे काय तर्क आहे ? मनुष्य देवाला पाहू शकतो किंवा त्याच्याशी बोलू शकतो, हे एखादे छायाचित्र किंवा ‘सेल्फी’ (स्वतःच स्वतःसह इतरांचे छायाचित्र काढणे) घेऊन एका जरी व्यक्तीने सिद्ध करून दाखवले, तर मी पदाचे त्यागपत्र देईन, असे आव्हान फिलिपिन्सचे अध्यक्ष रोड्रीगो दुतेर्ते यांनी दिला आहे. यापूर्वी त्यांनी ‘ईश्‍वर मूर्ख आहे’, असे विधान केले होते. दावाओ या शहरात झालेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक कार्यक्रमात ते बोलत होते. फिलिपिन्समध्ये कॅथोलिक ख्रिस्ती लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून दुतेर्ते नेहमीच त्यांच्यावर टीका करतात. बायबलमधील अ‍ॅडम आणि ईव्ह यांच्या कथेवरही त्यांनी टीका केली होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now