नेदरलॅण्डमध्ये काही सार्वजनिक ठिकाणी बुरख्यावर बंदी

जिहादी आतंकवादग्रस्त भारतात असा निर्णय कधी घेण्यात येणार ?

हेग (नेदरलॅण्ड) – युरोपमधील नेदरलॅण्डनेही देशात सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी घातली आहे. नेदरलॅण्डच्या संसदेने या संदर्भातील कायद्याला मान्यता दिली; मात्र सर्वच ठिकाणी बुरख्यावर बंदी नाही, तसेच हिजाबवरही बंदी घातलेली नाही. सार्वजनिक परिवहन, शिक्षण संस्था, सरकारी कार्यालय आणि रुग्णालये या ठिकाणीच यावर बंदी असणार आहे. रस्त्यावरून जातांना बुरखा घालता येऊ शकतो; मात्र पोलिसांनी चेहरा दाखवण्याची मागणी केल्यास तो दाखवावा लागणार आहे. युरोपमधील फ्रान्स, बेल्जियम, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, बुल्गेरिया, स्पेन, इटली, जर्मनी या देशांमध्ये काही ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

स्वित्झर्लंडमध्ये मात्र बुरख्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. देशभरातून यासाठी मागणी करण्यात येत होती. यासाठी देशात सार्वमत घेण्याचीही मागणी करण्यात येत होती; मात्र सरकारने ‘लोकशाहीत असे करता येत नाही’, असे म्हटले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now