स्वतःच्या नौदलाचे सामर्थ्य वाढवून समुद्रावर वर्चस्व निर्माण केल्यास चीन कर्जबाजारी होईल ! – न्यूयॉर्क टाइम्सचा दावा

न्यूयॉर्क – चीन स्वतःचे नौदल सर्वशक्तीशाली करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहे. त्यासाठीच त्याने श्रीलंकेतील हंबनटोटा बंदराचे अधिग्रहण केले आहे. या समुद्रक्षेत्रावर स्वतःचे वर्चस्व रहावे, असे चीनला वाटत आहे; मात्र यामुळे चीन कर्जबाजारी होईल आणि इतर देशांनाही यात ओढेल, असा दावा अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क टाइम्स’ दैनिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात केला आहे.

१. या बंदराच्या विकासावरील गुंतवणूक आणि त्यापासून भविष्यात मिळणार्‍या लाभांचा ताळेबंद न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात मांडला आहे. याद्वारे कर्जाची परतफेड होण्याइतका व्यवहार आणि व्यापार शक्य होणार नाही, असे यात म्हटले आहे.

२. भारताने या बंदराच्या विकासासाठी कर्ज देण्याचा प्रस्ताव पूर्वीच नाकारला होता. राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांनी चीनकडे यासंबंधी प्रस्ताव पाठवला होता.

३. श्रीलंकेत वर्ष २०१५ मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या बंदर प्रकल्पाचा निधी थेट प्रचार मोहिमेसाठी वापरण्यात आल्याचे पुरावे न्यूयॉर्क टाइम्सकडे आहेत. यासाठी १ अब्ज अमेरिकी डॉलर्सचे कर्ज घेण्यात आले आहे. श्रीलंकेवरील कर्जाचे ओझे यामुळे वाढले आहे. आंतरराष्ट्रीय कर्ज देणार्‍यांचेही ओझे त्यांच्यावर आहे. यामुळे चीनही तोट्यात जाईल, असा दावा करण्यात आला आहे.

४. भारताच्या समुद्रकिनार्‍यापासून अंतर अल्प असल्याने चीनने हा व्यवहार केला आहे. येथे नौदल तळ उभारण्याची चीनची महत्त्वाकांक्षा आहे; मात्र श्रीलंकेच्या निमंत्रणाविना येथे सैनिकी कवायती होऊ नयेत, असे अंतिम कराराच्या मसुद्यात नमूद आहे.


Multi Language |Offline reading | PDF