डोनाल्ड ट्रम्प यांनी ५ इस्लामी देशांवर प्रवासबंदीचा घातलेला निर्णय योग्यच ! – अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत ५ इस्लामी देशांतून येणार्‍या नागरिकांवर घातलेला प्रवासबंदीचा निर्णय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवला आहे. यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने हा निर्णय अयोग्य ठरवला होता. सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले की, प्रवासबंदीच्या निर्णयामुळे इमिग्रेशन कायद्याचे उल्लंघन होते किंवा एका धर्माच्या आधारे दुसर्‍या धर्माला सरकारी प्राधान्य दिल्यामुळे अमेरिकी राज्यघटनेच्या पहिल्या दुरुस्तीचे उल्लंघन होते, हे या निर्णयाला आव्हान देणारे सिद्ध करू शकले नाहीत. सरकारने राष्ट्रीय सुरक्षेसाठी घेतलेला निर्णय योग्य आहे. या नीतीवर न्यायालयाचे स्वतःचे कोणतेच मत नाही. ट्रम्प यांनी मागील वर्षी सप्टेंबर मासात प्रवासबंदीची घोषणा केली होती. याअंतर्गत इराण, लिबिया, सोमालिया, सिरिया आणि येमेन या देशांतून येणार्‍या लोकांना अमेरिकेत प्रवासबंदी करण्यात आली होती. त्यांच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.


Multi Language |Offline reading | PDF