मलेशियामध्ये मशिदीबाहेर तोकड्या कपड्यांत अश्‍लील नृत्य केल्यावरून पर्यटकांवर बंदी

भारतातील अनेक मंदिरांत तोकड्या कपड्यांत विदेशी पर्यटकच नव्हे, तर भारतीय हिंदूही जातात आणि तेथील पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न करतात अन् जर त्यावर प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला, तर तथाकथित पुरोगामी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले कंठशोष करतात !

कुआलालंपूर – मलेशियातील कोटा किनाबालू शहरातील एका मशिदीबाहेरील भिंतीवर चढून एका दांपत्याने तोकड्या कपड्यांत अश्‍लील नृत्य केल्याच्या घटनेनंतर येथे पर्यटकांना येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या घटनेची चित्रफीत सामाजिक माध्यमातून प्रसारित झाल्यावर हा निर्णय घेण्यात आला.

१. मशिदीचे प्रमुख जमाल साकरन यांनी नृत्य करण्याच्या घटनेचा निषेध करत साबाह राज्यातील मशिदींमध्ये येणार्‍या पर्यटकांवर तात्पुरत्या कालावधीसाठी बंदी घातली. इस्लामचे पावित्र्य राखण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

२. प्रांतीय पर्यटनमंत्री क्रिस्टिना लीव यांनी म्हटले की, या पर्यटक दांपत्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही; कारण कदाचित् त्यांना याचे गांभीर्य माहिती नसणार; मात्र आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. त्यांना याचे गांभीर्य आम्ही समजावून सांगणार आहोत.


Multi Language |Offline reading | PDF