श्रीलंकेतील कुलुतुरा जिल्ह्यात गोहत्याबंदीचा ठराव संमत

हिंदु नेते मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांच्याकडून अभिनंदन !

श्री. मेरील मुनसिंगे (उजवीकडे) यांचा शाल देऊन सत्कार करतांना श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन्

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेतील कलुतुरा जिल्ह्यात कुठल्याही कारणासाठी गोहत्या करण्यावर बंदी घालणारा ठराव संपूर्ण स्थानिक शासकीय संस्था असलेल्या ‘सभा’मध्ये संमत करण्यात आला आहे. या ठरावानिमित्त श्रीलंकेतील हिंदु नेते मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांनी जगभरातील हिंदु जनतेच्या वतीने मथुगामा प्रदेश सभेचे अध्यक्ष श्री. मेरील मुनसिंगे यांचे अभिनंदन करत त्यांचा सत्कार केला. या सभेमध्ये लोकांनी निवडलेले ३३ सिंहली बौद्ध सदस्य, तर १ मुसलमान सदस्य आहे. यांपैकी २७ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.


Multi Language |Offline reading | PDF