‘पाकने कितीही बडबड केली, तरी काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे सत्य पालटणार नाही !’

भारताने संयुक्त राष्ट्रात पाकला खडसावले !

वॉशिंग्टन – जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. वायफळ बडबड केल्याने कधीही सत्य परिस्थिती पालटत नसते, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रात काश्मीरचे सूत्र उपस्थित केल्यावरून खडसावले.

संयुक्त राष्ट्रात पाकच्या प्रतिनिधी मलिहा लोदी यांनी महासभेत हिंसाचार, जातीयवाद या विषयांवर भाष्य केले. त्या वेळी त्यांनी काश्मीरमध्ये होत असलेल्या नरसंहाराचा हवाला दिला. त्यावर भारताचे प्रतिनिधी संदीप कुमार बाय्यपू यांनी आक्षेप घेत सांगितले की, गेल्या एक दशकापासून संवेदनशील असलेल्या काश्मीरच्या प्रश्‍नावर गंभीर चर्चा होत आहे. त्याच वेळी पाकच्या प्रतिनिधीने भारतातल्या जम्मू-काश्मीरचा चुकीच्या पद्धतीने हवाला देत मंचाचा दुरुपयोग केला आहे. संयुक्त राष्ट्रात काश्मीरचे सूत्र उपस्थित करण्याची पाकची कुटनीती नेहमीच अयशस्वी राहिली आहे आणि त्यांना कोणाचेही समर्थन मिळालेले नाही.


Multi Language |Offline reading | PDF