निवडणुकीत फंड मिळावा म्हणून प्लास्टिकबंदी केली का ? – राज ठाकरे यांची टीका

मुंबई – प्लास्टिक निर्माण करणार्‍या आस्थापनांकडून आगामी निवडणुकीत फंड मिळावा म्हणून प्लास्टिकबंदी केली गेली नाही ना, अशी टीकात्मक शंका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केली. काही काळानंतर प्लास्टिकबंदीचा निर्णय केराच्या टोपलीत जाऊन सर्व काही पूर्ववत होईल, असा दावाही त्यांनी केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत श्री. ठाकरे बोलत होते.

जोपर्यंत महापालिका आणि राज्य सरकार स्वतःची कामे नीट करत नाहीत, तोपर्यंत कुणीही दंड देऊ नये, असे आवाहनही श्री. ठाकरे यांनी या वेळी केले. प्लास्टकबंदीसारख्या मोठ्या निर्णयावर मुख्यमंत्री गप्प कसे, हा निर्णय सरकारचा आहे कि फक्त विशिष्ट खात्याचा असा प्रश्‍नही त्यांनी या वेळी उपस्थित केला.

‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे अध्यक्ष रविंद्र मराठे यांच्यावरील कारवाईमागे मुख्यमंत्र्यांचाच हात असल्याची टीकाही श्री. ठाकरे यांनी या वेळी केली.


Multi Language |Offline reading | PDF