हिटलर आणि इंदिरा गांधी यांनी लोकशाहीला हुकूमशाहीत पालटण्यासाठी संविधानाचा वापर केला होता ! – अरुण जेटली

कलम ३७०, समान नागरी कायदा, राममंदिर आणि गोहत्याबंदी यांसाठी भाजप लोकशाही मार्गाने संविधानात पालट का करत नाही ?

नवी देहली – इंदिरा गांधी यांनी मूलभूत अधिकारांची पायमल्ली करत आणीबाणी लागू केली होती. हिटलर आणि इंदिरा गांधी यांनी लोकशाहीला हुकूमशाहीत पालटण्यासाठी संविधानाचा वापर केला होता, अशी टीका अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्वीटद्वारे केली आहे. आणीबाणीचा निषेध म्हणून भाजपने २५ जून हा ‘काळा दिवस’ पाळला. त्यावरून जेटली यांनी हे ट्वीट केले आहे.

हिटलरने विरोधी पक्षांच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणावर कारागृहात डांबले होते. त्यानंतरच त्याने त्याचे अल्पमतातील सरकार बहुमतापर्यंत नेले होते, असेही जेटली यांनी म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF