२७.६.२०१८ या दिवशी सूर्योदयसमयी चतुर्दशी ही तिथी असूनही वटपौर्णिमा असण्यामागील ज्योतिषशास्त्रीय कारण

निज ज्येष्ठ शुक्ल पक्ष चतुर्दशी २७ जून या दिवशी असलेल्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने…

सौ. प्राजक्ता जोशी

‘ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयसमयी असणारी तिथी ग्राह्य धरली जाते. हिंदु पंचांगातील ज्येष्ठ मासात येणारी पौर्णिमा हा दिवस ‘वटपौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. या वर्षी बुधवार, २७.६.२०१८ या दिवशी सकाळी ८.१३ पर्यंत निज ज्येष्ठ शुक्ल पक्ष चतुर्दशी ही तिथी आहे. बुधवार, २७.६.२०१८ या दिवशी सकाळी ८.१३ पासून गुरुवारी २८.६.२०१८ सकाळी १०.२३ पर्यंत ज्येष्ठ पौर्णिमा आहे, म्हणजे २८.६.२०१८ या दिवशी सूर्यादयाला पौर्णिमा ही तिथी आहे. असे असले, तरीही वटपौर्णिमा मात्र ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशीला दिलेली आहे. याचे कारण ‘सूर्यास्तापूर्वी ६ घटीपेक्षा (२ घंटे २४ मिनिटांपेक्षा) अधिक व्यापिनी अशा चतुर्दशीयुक्त असलेल्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीव्रत (वटपूजन) करावे’, असे वचन आहे. बुधवार, २७.६.२०१८ या दिवशी सकाळी ८.१३ पर्यंत ज्येष्ठ शुक्ल पक्ष चतुर्दशी असल्याने याच दिवशी पौर्णिमा तिथी सायान्हकाळी ६ घटीपेक्षा अधिक आहे; म्हणून २७.६.२०१८ या दिवशी वटपौर्णिमा दिलेली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी जरी चतुर्दशी ही तिथी असली, तरीही सूर्योदयानंतर मध्यान्हापर्यंत, म्हणजे दुपारी १.३० वाजेपर्यंत कोणत्याही वेळी वटपूजन करावे. शास्त्रवचनानुसार ज्येष्ठ शुक्ल पक्ष चतुर्दशी या तिथीला बुधवारी २७.६.२०१८ या दिवशी नेहमीप्रमाणे उपवासासह वटपूजन करावे.

यापूर्वी शके १९२७, १९३२, १९३८ आणि १९३९ मध्ये वरीलप्रमाणेच निर्णय करून वटपौर्णिमा दिलेली होती. (संदर्भ : दाते पंचांग)’

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद), महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, ज्योतिष विभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.६.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now