भ्रष्ट मुलांना जन्म देण्याऐवजी महिलांनी विनाअपत्य रहावे ! – भाजपचे आमदार पन्नालाल शाक्य

  • संस्कारी मुलांना जन्म देण्यासाठी पालकही संस्कारी असावे लागतात आणि त्यांनी मुलांवर चांगले संस्कार करावे लागतात ! जिजामातेमुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले, हे पन्नालाल शाक्य यांना माहिती आहे का ?
  • मुले जन्माला आल्यावर त्यांच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण द्यायला हवे, ते शाक्य यांचे भाजप सरकार कधी देणार ?

गुना (मध्यप्रदेश) – समाजात विकृती निर्माण करणार्‍या आणि दुर्गुण असलेल्या मुलांना महिलांनी जन्मच देऊ नये. त्यांनी विनाअपत्य रहावे; मात्र अशा मुलांना जन्म देऊ नये, जे संस्कारी नाहीत. कारण अशी मुले मोठी होऊन देश आणि समाज यांना भ्रष्ट करतात, असे विधान मध्यप्रदेशातील गुना येथील भाजपचे आमदार पन्नालाल शाक्य यांनी एका शासकीय कार्यक्रमामध्ये केले.

१. शाक्य पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या काळात चुकीचे धोरण आखणारे नेते जन्माला आले. अशा नेत्यांना शेवटी कोणत्या तरी महिलेनेच जन्म दिला आहे. (भाजपच्या काळात तरी चांगले धोरण आखणारे नेते कोठे आहेत ? – संपादक)

२. काँग्रेसने पूर्वी ‘गरिबी हटाव’, असा नारा दिला; पण देशातील गरिबी न्यून झाली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.