काश्मीरमध्ये सुट्टीवर घरी आलेल्या सैनिकाचे आतंकवाद्यांकडून अपहरण

रमझानमधील भाजप सरकारच्या एकतर्फी शस्त्रबंदीचा परिणाम !

भाजपची आत्मघातकी गांधीगिरी सैनिकांच्या मूळावर आली आहे, हे त्यांना कधी कळणार ?

श्रीनगर – पूँछ येथे सुटीसाठी घरी आलेल्या औरंगजेब या ४४ राष्ट्रीय रायफलच्या सैनिकाचे जिहादी आतंकवाद्यांनी अपहरण केले आहे. पुलवामामधून गाडीने ते घरी परतत असतांना हे अपहरण करण्यात आले. ते काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात तैनात होते. जिहादी आतंकवादी समीर टायगरला ठार करण्यात आलेल्या चकमकीत औरंगजेब सहभागी होते. औरंगजेब यांना शोधण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, असे सैन्याकडून सांगण्यात आले आहे. मागच्या वर्षी मे मासांत काश्मीरमध्ये उमर फय्याझ या सैन्याधिकार्‍याचे आतंकवाद्यांनी अपहरण करून त्यांची हत्या केली होती. ते विवाह सोहळयासाठी चाललेले असतांना त्यांचे अपहरण झाले होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now