देशात समान नागरी कायदा लागू करा !

उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डाची विधी आयोगाकडे मागणी

नवी देहली – उत्तरप्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाने विधी आयोगाकडे देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी केली आहे. विधी आयोगाने ७ ऑक्टोबर २०१६ या दिवशी लोकांकडून समान नागरी कायद्याविषयी १६ प्रश्‍नांवर मत मागवले होते. आता आयोगाने मत पाठवणार्‍यांना सविस्तर मत सादर करण्यास सांगितले आहे. त्यावर वक्फ बोर्डाने त्यांचे सविस्तर मत आयोगाला पाठवले आहे. बोर्डाचे अध्यक्ष वसिम रिझवी यांनी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती बी.एस्. चौहान यांना वरील मत पाठवून मागणी केली आहे.

बोर्डाने यात म्हटले आहे की, ज्या प्रकारे गोवा राज्यात समान नागरी कायदा आहे, तसाच देशात लागू करण्यात यावा. घटनेच्या कलम ४४ मध्ये म्हटले आहे की, देशात एकसारखा कायदा असावा. कलम २५ मध्ये धार्मिक स्वातंत्र्याविषयी सांगण्यात आले असले, तरी कलम ४४ च्या अंतर्गत समान नागरी कायदा लागू झाल्यास धार्मिक स्वातंत्र्यात कोणताही हस्तेक्षप होत नाही. स्वातंत्र्यानंतर हिंदु कायद्यामध्ये अनेक पालट करण्यात आले; मात्र मुसलमानांच्या कायद्यामध्ये तसे करण्यात आलेले नाही.