सांस्कृतिक खात्याचे मंत्रालय बंद करा ! – श्रीलंकेतील हिंदुत्वनिष्ठ सच्चिदानंदन् यांची मागणी

श्रीलंकेतील हिंदु सांस्कृतिक खात्याच्या मंत्रीपदावर मुसलमान व्यक्तीची नेमणूक

श्रीलंकेतील हिंदूंच्या या स्थितीविषयी भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटना कधी आवाज उठवणार आहेत ?

श्रीलंका येथील ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन्

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या सरकारने हिंदु धर्म आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून एका मुसलमान व्यक्तीची नियुक्ती केली आहे. हेे हिंदु समाजाला विष पाजण्यासारखेच झाले आहे, तरी यापेक्षा सरकारने हिंदु धर्म आणि सांस्कृतिक मंत्रालयालाच टाळे ठोकावे, अशी मागणी श्रीलंका येथील ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांनी एका पत्राद्वारे तेथील सरकारकडे केली आहे.

श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांनी पाठवलेल्या पत्रातील सूत्रे

१. कोणत्याही मुसलमानाला काफिराला (मुसलमानेतराला) नष्ट करण्याचे शिक्षण दिले जाते.

२. मुसलमान हिंदूंना पवित्र असणार्‍या गोवंशाची खाण्यासाठी हत्या करतात.

३. इस्लाम कुठल्याही ईश्‍वराचे सगुण अस्तित्व नाकारतो. मुसलमानांसाठी पवित्र भूमी असलेल्या सौदी अरेबियात विदेशातून येणार्‍या हिंदूंना देवतांची चित्रे खिशांत बाळगणे हा मोठा गुन्हा ठरतो.

४. हिंदु आणि इस्लाम यांचे जीवनमार्ग अनेक प्रकारांनी विसंगत आहेत. इतकेच नव्हे, तर देहलीतील इस्लामी आक्रमकांनी कोट्यवधी हिंदूंचा ६ शतकांपासून छळ केला. त्यांनी नालंदा विद्यापीठ आणि बौद्धांचे पवित्र बुद्ध गया नष्ट केले.

५. श्रीलंकेच्या आमरपाराय जिल्ह्यातील कालमुइनीकुकुडी येथील हिंदूंची २ मंदिरे उद्ध्वस्त करून त्यांचे मशिदीत रूपांतर केले होते. मंत्री हिबबुला यांनी उघडपणे घोषित केले की, काल्डी येथील काली मंदिर उद्ध्वस्त करून तेथे मशीद बांधण्यासाठी ते स्वतः उत्तरदायी आहेत.

६. इस्लामवादी आक्रमक धोरण चालवत आहेत. त्याद्वारे हिंदूंचे सक्तीचे धर्मांतर, खासगी हिंदु भूमीवर अवैध नियंत्रण करणे आणि सध्या दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या हिंदूंच्या लोकसंख्येत पालट करण्यासाठी अधिक अपत्ये जन्माला घालणे इत्यादी प्रकार घडत आहेत.

या परिस्थितीत एका मुसलमान व्यक्तीस हिंदु धर्म आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून नियुक्त करणे, म्हणजे हिंदूंचा नाहक बळी देण्यासारखे आहे. श्री पोणमन्बालम रामनाथनया या हिंदूच्या एकहाती प्रयत्नांमुळे ५ सहस्र बौद्ध वर्ष १९१५-१६ मध्ये ब्रिटिशांच्या कारागृहातून मुक्त होऊन श्रीलंकेत आले. बौद्धांच्या इतिहासातील सर्वांत कठीण काळात हिंदूंनी केलेल्या साहाय्याप्रती बौद्धांनी कृतज्ञता व्यक्त केली नाही आणि अत्यंत असहिष्णु समजल्या जाणार्‍या मुसलमान व्यक्तीस हिंदूंच्या बोकांडी बसवले.