झारखंडमध्ये म्हशी चोरणार्‍या टोळीतील दोघांचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू

अवैध गोहत्या करणारे आणि गोवंश चोरणारे यांचा बंदोबस्त करण्याविषयी पंतप्रधान मोदी कधीच काही बोलत नाहीत !

गोड्डा (झारखंड) – येथील देवबंद आणि सुंदर पहारी या भागांच्या सीमेवरील बनकट्टी गावात म्हशी चोरणार्‍या टोळीतील मुमतझा अन्सारी आणि छकरू अन्सारी या दोघांचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना १३ जूनला सकाळी घडली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली, तर म्हशी चोरल्याच्या प्रकरणीही पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. मृत्यू झालेल्या दोघांवर यापूर्वी म्हशी चोरल्याप्रकरणी गुन्हा नोंद असल्याचे पोलीस अन्वेषणात समोर आले आहे. (मृत्यू झालेल्या दोघांनी यापूर्वीही म्हशी चोरल्या होत्या, तेव्हाच त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला असता, तर जमावाला आज कायदा हातात घेण्याची अयोग्य कृती करावी लागली नसती ! कायद्याचा गुन्हेगारांना कोणताही धाक राहिला नसल्यामुळेच जनतेचा उद्रेक होत आहे, याचा सरकार कधी विचार करणार ? गोरक्षकांना ‘समाजकंटक’ म्हणणारे पंतप्रधान मोदी याकडे कधी लक्ष देणार ? – संपादक) जमावाच्या मारहाणीत मृत्यू झालेले मुमतझा अन्सारी आणि छकरू अन्सारी हे बांझी गावात रहात होते. घटनास्थळापासून हे गाव ३० ते ४० किलोमीटर अंतरावर आहे.

सकाळी एक टोळी म्हशी चोरण्यासाठी देवबंद गावात पोहोचली. तेथून जवळपास १२ म्हशी चोरून ही टोळी पळ काढत होती. (दिवसाढवळ्या म्हशी चोरून नेण्याचा प्रयत्न केला जातो, यावरून भाजपची सत्ता असणार्‍या झारखंडमधील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती लक्षात येते ! – संपादक) देवबंदपासून २-३ किलोमीटर अंतरावर असलेल्या बनकट्टी गावात ही टोळी पोहोचली असता ग्रामस्थांनी त्यांना पकडले. या वेळी देवबंद गावातील ग्रामस्थही तिथे पोहोचले. यानंतर जमावाने म्हशी चोरणार्‍यांना बेदम मारहाण केली. या वेळी ५ चोरट्यांपैकी ३ जणांनी तेथून पसार झाले, तर २ जण जमावाच्या तावडीत सापडले.