बिबट्याने ७ वर्षांच्या मुलाला ठार केल्याने संतप्त गावकर्‍यांनी ८ एकर जंगल जाळले !

एका मुलाला ठार केल्यानंतर बिबट्या रहात असलेले जंगल गावकर्‍यांनी नष्ट केले; मात्र प्रतिदिन भारतीय सैनिक आणि नागरिक यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करणार्‍या पाकला शासनकर्ते नष्ट करत नाहीत !

बागेश्‍वर (उत्तराखंड) – बिबट्याने ७ वर्षांच्या एका मुलाला उचलून नेऊन ठार केल्याने येथील हरिनागरी गावातील ४-५ सहस्र संतप्त गावकर्‍यांनी वनविभागाच्या ८ एकर जंगलाला आग लावल्याची घटना समोर आली आहे. बिबट्याने त्या मुलाला ओढत जंगलात नेले होते. गावकर्‍यांनी शोध घेतला असता २५० मीटर अंतरावर त्यांना त्याचा मृतदेह आढळला. गेल्या ३ मासांत बिबट्याने आक्रमण केल्याची ही दुसरी घटना असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बिबट्याला लपण्यासाठी जागा मिळू नये, यासाठी गावकर्‍यांनी जंगलाला आग लावली, अशी माहिती वनअधिकार्‍याने दिली. गावकर्‍यांनी आग लावल्यावर त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी कोणालाही पुढे जाऊ दिले नाही, असे वनअधिकार्‍याने सांगितले. या बिबट्याला नरभक्षक घोषित करण्यात आले असून त्याला ठार करण्याचा आदेश देण्यात आला आहे. (बिबट्याने पहिल्यांदा आक्रमण केले, तेव्हाच हा निर्णय का घेतला नाही ? जनतेने कायदा हातात घेतल्यावर वनअधिकारी जागे होणार आहेत का ? – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now