तक्रार प्रविष्ट होऊन १६ दिवस झाले, तरीही पोलिसांकडून कोणालाही अटक नाही !

सनातनच्या साधिका श्रीमती शशिकला पै यांच्यावर समाजकंटकांनी केलेले जीवघेणे आक्रमण

रामनाथी (गोवा) येथे वास्तव्य करणार्‍या सनातनच्या साधिका श्रीमती शशिकला पै यांच्यावर मोठ्या संख्येने जमलेल्या समाजकंटकांनी आपापसात संगनमत करून आणि कट रचून कोयते, कुर्‍हाडी, लाठी आदी हत्यारांद्वारे ३० मे या दिवशी जीवघेणे आक्रमण केले. या वेळी जमावाने त्यांच्याकडील भ्रमणभाषसंच हिसकावून घेतले, तसेच त्यांच्या चारचाकी वाहनाचीही तोडफोड केली. याविषयी श्रीमती पै यांनी शिवराम बांदोडकर, शानू गावडे, रोहिदास गावडे, सविता गावडे आणि रेखा गावडे (सर्व रहाणार बोकडबाग, बांदोडा, फोंडा, गोवा.) यांच्या विरोधात ३० मेच्या दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. त्यानंतर पोलिसांनी १ जून या दिवशी प्रथमदर्शी अहवाल नोंदवला असूनही अद्यापपर्यंत (१४ जूनपर्यंत) कोणालाही अटक केलेली नाही.