सिंगापूर येथील मेणाच्या पुतळ्यांचे जगप्रसिद्ध ‘मॅडम् टूसाड्स’ संग्रहालय !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेत ४ विद्यार्थी-साधक दक्षिण आशियाच्या आध्यात्मिक दौर्‍याच्या निमित्ताने ८.४.२०१८ ते १२.४.२०१८ या कालावधीत सिंगापूर येथे होते. या वेळी सिंगापूर येथील ‘मॅडम् टूसाड्स’ हे मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय बघायचा योग आला. त्या संग्रहालयातील वातावरण, मेणाचे पुतळे यांची आध्यात्मिक दृष्टीने केलेली मीमांसा येथे प्रसिद्ध करत आहोत.

मेणापासून बनवलेला क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा पुतळा
अभिनेत्री ऐश्‍वर्या राय-बच्चन यांचा पुतळा
पॉप गायक एल्विस प्रिसले यांचा पुतळा
राणी एलिझाबेथ २ यांचा पुतळा

डन येथील ‘मॅडम् टूसाड्स’ हे मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय जगप्रसिद्ध आहे. त्या संग्रहालयाच्या जगभर अनेक ठिकाणी शाखा उघडल्या आहेत. त्यांतीलच एक शाखा आम्हाला सिंगापूर येथे पहायला मिळाली. या संग्रहालयात जगप्रसिद्ध नेते, खेळाडू, गायक, अभिनेते-अभिनेत्री, हॉलीवूड चलचित्रांतील काही पात्रे, अशा वेगवेगळ्या व्यक्तींचे मेणाचे पुतळे बघायला मिळतात. त्यांमध्ये महात्मा गांधी, नरेंद्र मोदी, नेल्सन मंडेला, बराक ओबामा, राणी एलिझाबेथ २, सिंगापूरचे माजी पंतप्रधान ली कुआन् यू, इंडोनेशियाचे पंतप्रधान जोको विडोडो, चीनचे राष्ट्रपती झी जिंग, या नेत्यांच्या मेणाच्या पुतळ्यांचा समावेश आहे. खेळाडूंमध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो, सचिन तेंडूलकर, डेविड बेखाम्, मुहम्मद अली, सेरिना विलियम्स् आदींच्या पुतळ्यांचा, तसेच अभिनेते-अभिनेत्री यांच्यामध्ये अमिताभ बच्चन, शाहरूख खान, माधुरी दीक्षित, ऐश्‍वर्या राय, ह्रितिक रोशन, हॉलीवूड नट ब्रॅड पिट्, जोनी डेप्, लियोनार्डो दीकापरिओ आदींच्या पुतळ्यांचा आणि गायकांमध्ये मायकल जॅक्सन, एल्विस प्रिसले, मडोना आदींच्या पुतळ्यांचा समावेश आहे.’

मेणाच्या पुतळ्यांच्या संग्रहालयाविषयी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी दिलेला अमूल्य दृष्टीकोन

श्री. विनायक शानभाग

१. मेण हे तामसिक असल्याने त्यापासून बनवले जाणारे पुतळे तामसिक असणे आणि राजसिक अन् तामसिक नेते, नट आदींचे पुतळे असल्याने या संग्रहालयात रज-तम अधिक असणे

‘कलियुगात सध्या तामसिक अशा मेणापासून पुतळे, कलाकृती बनवण्याची पद्धत प्रचलित होत आहे. आपण दगड-माती, लोह यांच्या मूर्ती आणि मेणाचे पुतळे यांची तुलना केली, तर मेण हे तामसिक आहे. त्यामुळे तामसिक वस्तूपासून बनवलेले पुतळेही तामसिकच असतात. त्यांत देवता किंवा संत-महात्म्यांचे पुतळे असतील, तर जरा तरी सात्त्विकता येऊ शकते. येथे तर राजसिक आणि तामसिक नेते, नट आदींचे पुतळे असल्याने त्या संग्रहालयात अत्याधिक रज-तम आहे.

संत-महात्म्यांमुळे समाज सत्कर्माकडे वळतो. समाजाची नैतिकता वाढते, तर राजकारणी, खेळाडू, नट-नट्या यांच्या आचरणामुळे समाज घडत नाही. त्यामुळे मेणाच्या पुतळ्यांच्या संग्रहालयात जाणारे बाहेर येतांना रज-तमाचे आवरण घेऊनच बाहेर येतात.

२. मेणाचे पुतळे सुंदर वाटणे मानसिक स्तरावरील असून स्पंदनशास्त्रानुसार त्यांचा समाजावर होणारा विपरीत परिणाम समजणे

लोकांना मेणाच्या पुतळ्यांकडे बघून ‘किती सुंदर आहेत !’, असे वाटते. हे मानसिक स्तरावरचे झाले. मेणाच्या पुतळ्यांकडे कला म्हणून न बघता आपण त्यांतील स्पंदनशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, तरच त्यांचा समाजावर होणारा योग्य किंवा विपरीत परिणाम कळेल. कलेकडे कला म्हणून न बघता ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’ म्हणून बघायला हवे. समाजाला अध्यात्मशास्त्र ठाऊक नसल्याने बहुसंख्य समाज अशा तामसिक गोष्टींकडे आकर्षिला जात आहे. ‘प्रस्तुत काळात समाजाला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अध्यात्मशास्त्राचे ज्ञान करवून देणे’, याची अधिक आवश्यकता आहे.’

– श्री. विनायक शानभाग, सिंगापूर (२२.५.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now