सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या समारोपसत्रात हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केलेले मनोगत

अवघी नगरी हिंदूमय केली ! – डॉ. ईश्‍वर गुर्जर, सचिव, मंदसौर, मध्यप्रदेश.

आम्ही आमच्या गावाला ‘हिंदु राष्ट्र’च म्हणतो. आम्ही आणि आमचे गाव हिंदूमय झाले आहे. चौकाचौकांमध्ये भगवे ध्वज उभे केले आहेत आणि भगव्या कमानी उभ्या केल्या आहेत. ‘जय श्रीराम, हिंदु राष्ट्र’ या घोषणांचे स्टेन्सिल्स बनवून आम्ही शहरातील भिंतींवर लावले. सनातनच्या संपर्कात आल्यानंतर हे सगळे सात्त्विक पद्धतीने कसे करायचे, ते आम्हाला शिकायला मिळाले.

हिंदु राष्ट्राला विरोध करणार्‍यांनी अन्य ठिकाणाचा शोध घ्यावा ! – ज्योतिषाचार्य राजेंद्र शर्मा

हिंदु राष्ट्राचे नाव काढले की, हिंदुद्रोही आणि राजकीय पक्ष बुरख्यात शिरतात. विरोधकांनी कितीही विरोध केला, तरी वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. ज्यांना हिंदु राष्ट्र नको आहे, त्यांनी वर्ष २०२३ पर्यंत त्यांना आवडेल त्या ठिकाणी अन्यत्र रहाण्यास जावे.

हिंदु जनजागृती समितीची हिंदु राष्ट्राची संकल्पना आध्यात्मिक ! – उपानंद ब्रह्मचारी, संपादक, हिंदु एक्झिस्टन्स

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांस्कृतिक हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडली आहे, तर हिंदु जनजागृती समितीने आध्यात्मिक हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडली आहे. भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ येथून ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचा आवाज बुलंद झाला आहे.

प्रशासनाचा विरोध असतांनाही साधनेच्या बळावरच ‘हनुमान ध्वज यात्रा’ पार पडली ! – प्रेमचंद गुप्ता

आम्ही आमच्या शहरातील ३० ते ३५ अवैध मशिदी हटवल्या. त्यानंतर आम्ही तेथे काढलेल्या ‘हनुमान ध्वज यात्रे’ला प्रशासनाने विरोध केला. आयत्या वेळी यात्रा होऊ न देण्यासाठी प्रशासनाने दबाव टाकला. त्या वेळी मी देवाला मनोमन प्रार्थना केली, ‘देवा, तुझे कार्य आहे, ते तूच करवून घे’. साधनेची शक्तीच जणू त्या वेळी कार्यरत झाली आणि हनुमान ध्वज यात्रा कशी पार पडली, ते आम्हालाच कळले नाही. १० ते १५ सहस्र युवक या यात्रेला उपस्थित होते. ‘जो हिंदुहिताचे कार्य करील, तो देशावर राज्य करील’, अशी घोषणा देण्याची आज आवश्यकता आहे

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा तेलंगण राज्यात प्रसार करणार ! – श्रीनिवास चारी, संस्थापक, राष्ट्रीय शिवाजी सेना, तेलंगण.

धर्मांधांनी एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर आक्रमण केले होते, तेव्हा संघात नेमके काय चालते, या जिज्ञासेने मी संघाशी जोडलो गेलो. त्यानंतर हिंदु वाहिनीच्या माध्यमातून धर्मकार्यास आरंभ केला. या वेळी माझ्यासह कुटुंबावरही प्राणघातक आक्रमण झाले होते. आम्ही एक सभा घेण्याचे नियोजन केले असता काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सभेस विरोध केला. प्रशासनानेही अनुमती दिली नाही. विरोध झाला, तरीही मी धर्मकार्य चालूच ठेवले. हिंदुत्वाचे खरे कार्य करायचे असल्याने मी ‘राष्ट्रीय शिवाजी सेने’ची स्थापना करून त्या माध्यमातून धर्मकार्यास प्रारंभ केला आहे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे राज्यस्तरीय हिंदू अधिवेशन, सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन यांमध्येही सहभाग घेतला आहे. माझा हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा तेलंगण राज्यात मोठ्या प्रमाणात प्रसार करण्याचा मानस आहे.

ख्रिस्त्यांचा त्रास रोखण्यासाठी आणि अवैध चर्च हटवण्यासाठी कार्यरत ! – प्रवीणकुमार रवी, अध्यक्ष, हिंदु युवा मंच, छत्तीसगड

छत्तीसगडमधील ख्रिस्ती समाज हिंदूंना त्रास देत होता. हिंदु युवा मंचने त्यांचा प्रतिकार करणे चालू केल्यानंतर त्यांचा त्रास उणावला आहे. मंचच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांतील युवा आणि महिला यांचे संघटन करण्यात येत आहे. प्रतिवर्षी हिंदु नववर्षानिमित्त आमच्या भागात ५०० महिला शस्त्रास्त्रे घेऊन फेरी काढतात. एका ग्रामीण भागामध्ये ख्रिस्त्यांनी चर्च बांधले होते. त्या भागात नक्षलींचाही प्रभाव आहे. त्या भागातील चर्च हटवण्यात यावे, यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले; परंतु त्यांच्याकडून कारवाई झाली नाही. आताही तेे चर्च हटवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now