इथियोपियामध्ये बाप्तिस्मा करण्यासाठी तलावामध्ये उतरलेल्या पाद्य्राला मगरीने गिळले !

अदिस अबाबा (इथियोपिया) – आफ्रिका खंडातील इथियोपियामध्ये धर्मांतराच्या वेळी बाप्तिस्मा करण्यासाठी मर्केब ताबया जिल्ह्यातील अबाया तलावामध्ये उतरलेल्या दोशो एश्हेते नावाच्या ४५ वर्षीय पाद्य्राला मगरीने गिळल्याची घटना घडली. ज्या मगरीच्या जातीने त्याला गिळले ती जात सर्वांत मोठ्या नील नदीमध्ये आढळते. तिची लांबी २० फूट असते. या घटनेच्या वेळी तलावाच्या काठावर ८० जण उपस्थित होते.