अतृप्त आत्मा

प.पू. आबा उपाध्ये आणि कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘बेटा काल रात्री आला. त्या वेळी तेथे पिशाच होते. वास्तविक बेट्याला पिशाचबाधा होणार नाही आणि दिसणार नाही. ते पिशाच उरणचे भागवत म्हणून ज्याचा मृत्यू झाला होता, त्याचे होते. बरेच दिवस ते अडकून पडले आहेत या योनीत. त्यांना ओळखीचा गृहस्थ राजा दिसला; म्हणून त्याने प्रेमाने विचारले ‘येऊ का ?’ तेव्हा बेट्याने सांगितले ते योग्यच केले; परंतु एक गोष्ट करायची. तो कांदे-बटाटे भज्यांचा शौकीन होता. त्याला तेच पाहिजे होते. त्याला ‘येऊ का’, म्हणजे ‘भजी खाण्यासाठी येऊ का’ असे विचारायचे होते. जत्रेत तो भजी विकत असे. हे बेट्याला माहिती आहे. पितृ पंधरवड्याच्या शुद्ध षष्ठी-सप्तमीच्या मध्यात ही भजी रात्री अगदी उशिरा, म्हणजे १० ते ११ च्या दरम्यान त्याच्यासाठी दरवाजाच्या बाहेर एका कागदात नेऊन ठेव, म्हणजे त्याला शांती वाटेल.’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून) (११.९.१९८८)