(म्हणे) ‘संभाजी भिडे यांच्या सभांवर बंदी घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार !’ – रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

  • प्रक्षोभक विधाने करणारे ओवैसी यांच्या सभांवर बंदी घालण्याची मागणी रामदास आठवले यांनी कधी केली आहे का ?
  • पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या विधानाचा एकांगी विचार करून ब्राह्मणद्वेषापोटी टोकाचा निर्णय घेणारे रामदास आठवले स्वतःचेच अज्ञान प्रकट करत आहेत, असे म्हटल्यास वावगे काय ?
चित्र सौजन्य: थोडक्यात.कॉम

जालना – श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्या उलट-सुलट बोलण्यामुळे अस्थिरता निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांच्या सभांना बंदी घातली पाहिजे. यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी १२ जूनला घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. नाशिक येथे झालेल्या एका सभेत पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी ‘माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने अपत्य नसलेल्या दांम्पत्यांना अपत्यप्राप्ती होते’, असे वक्तव्य केले होते. या वाक्याचा विपर्यास करत विरोधात रामदास आठवले यांनी वरीलप्रकारे मागणी केली.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या विरोधात राज्य कुटुंब कल्याण संचालकांकडे तक्रार !

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

पुणे – आपल्या शेतातील आंबे खाल्ल्यास मुलगा होईल, असे विधान करून श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी गर्भलिंग निदान कायद्याचा भंग केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश बोराडे यांनी केली आहे.

बनावट डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्ती यांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणारे बोराडे यांनी पू. भिडेगुरुजी यांच्या वक्तव्याच्या विरोधात राज्य कुटुंब कल्याण संचालकांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. (पू. भिडेगुरुजी यांनी त्यांच्या भाषणात केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, हे वास्तव आहे. खासदार ओवैसी यांनीही संभाजीनगर येथील एका सभेत मध्यंतरी ‘संभाजीनगर येथील एका दुकानातील पान खाल्ल्यानंतर मुले होतात’, असे सांगितले होते. मग त्यांच्या विरोधात गणेश बोराडे यांनी राज्य कुटुंब कल्याण संचालकांकडे का तक्रार केली नाही ? यातूनच बोराडे यांचा जात्यंधपणा दिसून येतो ! – संपादक) याप्रकरणी पू. भिडेगुरुजी यांच्या विरोधात सक्त कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. येत्या १५ दिवसांत पू. भिडेगुरुजी यांच्यावर कारवाई न केल्यास न्यायालयात जाण्याची चेतावणीही त्यांनी दिली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now