पुलवामा (काश्मीर) न्यायालयाच्या आवारात झालेल्या आतंकवाद्यांच्या आक्रमणात २ पोलीस हुतात्मा

  • रमझानच्या काळात एकतर्फी शस्त्रसंधी केल्याचा परिणाम !
  • पोलिसांच्या या हौतात्म्याला भाजप आणि पीडीपी सरकार उत्तरदायी आहे !

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील न्यायालयाच्या आवारात १२ जूनच्या पहाटे आतंकवाद्यांनी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या पथकावर आक्रमण केले. त्यात २ पोलीस हुतात्मा, तर ३ घायाळ झाले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारानंतर आतंकवाद्यांनी पोलिसांकडील बंदुका घेऊन पळ काढला. (स्वतःच्या बंदुकाही सुरक्षित ठेवू न शकणारे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ? – संपादक) यानंतर त्यांनी न्यायालयाजवळच्या शासकीय महाविद्यालयाबाहेरील पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. यात एक पोलीस घायाळ झाला.

अनंतनाग येथील आक्रमणात १० पोलीस घायाळ

अनंतनागमध्येही आतंकवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पोलिसांवर गोळीबार केला. त्यांनी येथील जंगलात गस्तीवर असलेल्या पोलिसांवर ग्रेनेड फेकले. यात १० पोलीस घायाळ झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. त्यातील एका पोलिसाची प्रकृती चिंताजनक आहे.