जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांच्या इफ्तार पार्टीत राष्ट्रगीताचा अवमान

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचीही उपस्थिती

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांचा राज्यातील कारभार पहाता त्यांच्या मेजवानीमध्ये असे होणे, हे आश्‍चर्यजनक नाही !

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी ७ जून या दिवशी येथे इफ्तारच्या मेजवानीचे आयोजन केले होते. या मेजवानीच्या वेळी राष्ट्रगीत वाजवण्यात आले; मात्र या वेळी उपस्थित असणारे अनेक जण उभे राहिले नव्हते. याविषयीची एक चित्रफीत सध्या सामाजिक माध्यमातून सर्वत्र प्रसारित होते आहे. विशेष म्हणजे या मेजवानीच्या वेळी गृहमंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल एन्.एन्. व्होरा, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक नामवंत उपस्थित होते. या प्रकरणी मेहबूबा मुफ्ती सरकारकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now