आसाममधील विहिंप आणि बजरंग दल यांमधील ९० टक्के कार्यकर्त्यांचे त्यागपत्र

वर्ष २०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात प्रचार करणार

  • हिंदुत्वाविषयी गांधीगिरीची भूमिका घेतल्यास खरे हिंदुत्वनिष्ठ कधीही ते स्वीकारणार नाहीत आणि ते त्यांचा वेगळा मार्ग निवडतील, हेच या घटनेतून उघड होते !
  • भविष्यात हिंदु संघटनांनी हिंदुत्वाविषयी अवसानघातकी भूमिका घेणे सोडले नाही, तर संपूर्ण देशातच त्यांच्या संघटनांमध्ये अशी स्थिती निर्माण होईल !

गौहत्ती (आसाम) – येथील विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी संघटनेचा त्याग केला आहे. ‘वर्ष २०१९ च्या निवडणुकीत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार करणार आहोत’, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.

१. बजरंग दलाचे माजी जिल्हा संयोजक दीपज्योती शर्मा यांनी त्यागपत्राच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी म्हटले की, गौहत्तीमधील बजरंग दलाच्या ८२० पैकी ८१६ कार्यकर्त्यांनी संघटनेचा त्याग केला आहे.

२. दीपज्योती शर्मा पुढे म्हणाले, ‘‘केवळ गौहत्तीच नाही, तर संपूर्ण आसाममध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते संघटना सोडून जात आहेत. संपूर्ण आसाममधील १४ सहस्र कार्यकर्त्यांपैकी १३ सहस्र ९०० कार्यकर्त्यांनी संघटना सोडली आहे.’ स्वतः शर्मा यांनीही संघटनेचे त्यागपत्र दिले आहे.

३. दीपज्योती शर्मा यांनी पुढे माहिती देतांना सांगितले की, गौहत्तीमधील विहिंपच्या ४०० पैकी ३८० सदस्यांनी संघटनेला सोडचिठ्ठी दिली आहे. यांत राज्य सल्लागार डॉ. टी.के. शर्मा यांचाही समावेश आहे.

४. दीपज्योती शर्मा त्यागपत्राविषयी म्हणाले, ‘‘मोदी सरकारने अनेक आश्‍वासने पाळलेली नाही. त्यामुळे लोकांमध्ये अप्रसन्नता आहे.’’

५. दीपज्योती शर्मा यांनी पुढे असेही सांगितले की, विहिंप सोडून गेलेले डॉ. प्रवीण तोगाडिया नवीन पक्षाची घोषणा करणार आहेत. हा पक्ष देशभरात मोदी यांचाविरोधात लोकसभेच्या वेळी प्रचार करणार आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now