डेन्मार्कमध्येही बुरखा आणि हिजाब घालण्यावर बंदी

युरोपातील देश सार्वजनिक ठिकाणी बुरख्यावर बंदी घालतात; मात्र नेहमी पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणारे भारतीय आणि शासनकर्ते मात्र याचे अनुकरण करत नाहीत !

कोपनहेगन (डेन्मार्क) – डेन्मार्कने अन्य युरोपियन देशांप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि हिजाब परिधान करण्यावर बंदी घातली आहे. डेन्मार्कच्या संसदेने या संदर्भात कायदा संमत केला आहे. मानवी अधिकार कार्यकर्त्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. ‘कुठल्याही धर्माला लक्ष्य करण्याचा आपला हेतू नाही’, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

१. येत्या १ ऑगस्टपासून या कायद्याची कार्यवाही चालू होणार असून ती कशी करायची, ते पोलिसांवर अवलंबून आहे, असे डेन्मार्कचे न्यायमंत्री सोरेन पोयुलसेन यांनी सांगितले.

२. या कायद्यानुसार योग्य कारण असेल, तर लोकांना त्यांचा चेहरा झाकून ठेवण्याची अनुमती आहे. उदाहरणार्थ कडाक्याची थंडी, दुचाकी चालवतांना लोकांना त्यांचा चेहरा झाकता येईल.

३. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना १ सहस्र क्रोनर (डेन्मार्क चलन) दंड ठोठावण्यात येणार आहे. दुसर्‍यांदा नियमाचे उल्लंघन करतांना पकडले, तर १० सहस्र क्रोनरचा दंड किंवा ६ मास कारावासाची शिक्षा होऊ शकते.

४. यापूर्वी फ्रान्स, बेल्जियम, नेदरलॅण्ड, बुल्गारिया, स्वित्झर्लंड आणि जर्मनी येथे यापूर्वीच सार्वजनिक ठिकाणी बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे, तसेच नॉर्वेमध्ये शाळा आणि विश्‍वविद्यालये येथे यावर बंदी आहे.


Multi Language |Offline reading | PDF