न्यूझीलंडमधील पाद्री होपफूल ग्लोरियावेल हे महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचे उघड

कथित आरोपांवर हिंदूंच्या संतांची सातत्याने अपकीर्ती करणारी भारतातील प्रसारमाध्यमे पाद्य्रांचे हे रूप मात्र दडपतात !

ऑलंड (न्यूझीलंड) – न्यूझीलंडमध्ये होपफूल ग्लोरियावेल नावाचे पाद्री वर्ष १९६९ पासून एक धार्मिक संस्था चालवत होते. त्यांचा नुकताच मृत्यू झाला. यानंतर अनेक महिलांनी त्यांच्याविषयीचे वाईट अनुभव उघड केले आहेत. ‘होपफूल याने अनेकांना बंदी बनवून ठेवले होते. त्यांनी अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. धर्माच्या नावाखाली हा पाद्री अत्याचार करत होता’, असे या महिलांनी सांगितले. होमफूल मूळचा ऑस्ट्रेलियामधील आहे.

१. एका महिलेने सांगितले की, तो हैवान होता. मी जेव्हा १९ वर्षांची होती, त्या वेळी त्याने माझे ३ वेळा लैंगिक शोषण केले.

२. एका तरुणीने सांगितले की, तो माझ्यावर उपचार करण्याच्या नावाखाली माझे लैंगिक शोषण करत होता.

३. होपफूल यांच्या संस्थेत अद्यापही ५५० लोक रहातात. येथे महिलांना पुरुषांची दासी बनून रहावे लागते. त्यांना चेहरा लपवावा लागतो. त्यांचा बलपूर्वक विवाहही करून दिला जातो. होपफूलची नात या नियमांना आणि त्याच्या वागणुकीला कंटाळून संस्था सोडून पळून गेली होती.


Multi Language |Offline reading | PDF