मेहबूबा मुफ्ती यांच्या हट्टामुळे सीमेवरील परिस्थिती चिघळली ! – भाजपचे जम्मू-काश्मीरमधील आमदार लाल सिंह

पाककडून नियंत्रणरेषेवर गोळीबार

मेहबूबा मुफ्ती हट्ट करतात आणि राज्यातील सहकारी असणारा अन् केंद्रातही सत्तेत असणारा भाजप हा हट्ट कसा पूर्ण करतो ?, याविषयी लाल सिंह यांनी सांगायला हवे !

जम्मू – सीमेवर पाककडून गोळीबार सतत चालू आहे, है दुर्दैवी आहे. सरकारने ‘रमझानमध्ये गोळीबार होणार नाही’, असे म्हटले, तेव्हा त्यांचा उद्देश चांगला होता; पण या महिलेच्या (मेहबूबा मुफ्ती यांच्या) हट्टामुळे परिस्थिती इतकी बिघडली आहे, असा दावा भाजपचे जम्मू-काश्मीरमधील आमदार लाल सिंह यांनी केला. (भाजपच्या एका आमदाराला जे कळते, ते भाजपच्या केंद्रातील मंत्र्यांना कळत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक) लाल सिंह यांनी कठुआ येथील कथित सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील आरोपी निर्दोष असल्याचे सांगितले होते. त्यांनी आरोपींचे समर्थन केल्यावर त्यांना मंत्रीपदाचे त्यागपत्र द्यावे लागले होते.

पाकिस्तानने २४ मेच्या सकाळीही उरी सेक्टरच्या कमाल कोटमध्ये नियंत्रणरेषेवर गोळीबार केला. आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तान गेल्या १० दिवसांपासून अनेक भागांत गोळीबार करत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी झाली आहे. अनुमाने ७६ सहस्र नागरिकांचे १०० हून अधिक गावांतून स्थलांतर करण्यात आले आहे. वर्ष १९७१ च्या युद्धानंतर प्रथमच अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now