‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष रवींद्र घोष यांच्या घरावर धर्मांधांचे पुन्हा आक्रमण

• मौल्यवान वस्तू लुटल्या !

• गृहमंत्र्यांकडून कारवाई नाही !

  • बांगलादेशमध्ये हिंदूंसाठी कार्य करणार्‍यांवर अशी आक्रमण होत असतांना भारतातील आणि जगातील मानवाधिकार संघटना कुठे आहेत ?
  • केंद्रातील भाजप सरकारने अधिवक्ता घोष यांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करायला हवेत !
  • कुठे भारताचे पंतप्रधान ‘अल्पसंख्यांकासाठी मध्यरात्रीही साहाय्यासाठी तत्पर असेन’, असे म्हणतात, तर कुठे बांगलादेशचे गृहमंत्री अल्पसंख्यांकांना हाकलून लावतात !

ढाका – बांगलादेशमध्ये हिंदूंच्या अधिकारांसाठी लढणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या येथील घरावर २३ मेच्या रात्री ८.३० वाजता आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू पळवण्यात आल्या. या आक्रमणाविषयी बांगलादेशच्या गृहमंत्र्यांना सांगितले असता त्यांनी आरोपींच्या विरोधात कारवाई करण्याचे टाळले. अधिवक्ता घोष यांच्या येथील घरावर यापूर्वी २४ एप्रिल २०१८ ला रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास आक्रमण करण्यात आले होते. बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांकांसाठी मानवाधिकाराच्या कृती करण्यास अधिवक्ता घोष यांना रोखण्यासाठी हे कटकारस्थान रचले जात आहे. ढाका शहराचे नगरसेवक हाजी महंमद नूर अलाम यांनी अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या विरोधात पैशाच्या गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणी अवैधरित्या फौजदारी गुन्हा नोंदवला आहे.

१. अधिवक्ता घोष यांनी बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन खान कमल यांची त्यांच्या ढाका येथील निवासस्थानी भेट घेऊन आरोपींच्या विरोधात कारवाईची मागणी केली; मात्र गृहमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून उलट अधिवक्ता घोष यांच्यावरच आरोप केले.

२. गृहमंत्री म्हणाले की, आपण देशाच्या एकात्मतेची हानी करत आहात. आपण देशाला संकटात टाकत आहात. त्यांनी असे आरोप केल्याने अधिवक्ता घोष यांना धक्का बसला.

३. या आक्रमणाविषयी अधिवक्ता घोष म्हणाले, ‘‘मला आता बांगलादेशमध्ये असुरक्षित वाटू लागले आहे. माझ्या जिवालाही धोका आहे. बांगलादेशमधील अल्पंसंख्यांकांच्या रक्षणासाठी जागृत नागरिकांनी पुढे येणे आवश्यक आहे.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now