काँग्रेसचा हात : डावे आणि देशद्रोही यांंना साथ !

कर्नाटकमध्ये सध्या चालू असलेल्या रणकंदनाच्या निमित्ताने काँग्रेस आणि डावे या अभद्र युतीची खरी ओळख करून देणारा लेख !

१. मोदी शासनाला प्रतिदिन निरनिराळ्या सूत्रात अडकवण्यासाठी नव्या नव्या योजना राबवल्या जात आहेत !

सियाचीनमधील बर्फाच्या वादळावर मात करून परत आलेला वीर सैनिक हनुमंथप्पा याला भेटण्यासाठी ९ फेब्रुवारीला पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी रुग्णालयात गेले होते, त्याचवेळी राजधानी देहलीच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालय (जेएन्यू) या ठिकाणी विद्यार्थ्यांचा एक गट केवळ भारताविरुद्ध घोषणाच देत नव्हता, तर भारताची न्यायव्यवस्था आणि राष्ट्रपतींची चेष्टा करत काश्मिरी फुटीरतावादी महंमद अफझलला दिलेली फाशी चुकीची असण्यासंदर्भात आणि तो निर्दोष असल्याचे सांगत प्रदर्शन करत होता. या विश्‍वविद्यालयाचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या अशा प्रकारच्या बौद्धिक कुकृत्यात सहभाग घेण्याचा इतिहास बघता जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने स्थापन झालेल्या या विश्‍वविद्यालयासाठी ही नवीन गोष्ट नव्हती. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ७६ जवानांना मारले होते, त्या वेळी जेएन्यूमधील विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे उत्सव साजरा केला होता. मागील काही वर्षांपासून जेएन्यूमध्ये अशाच प्रकारे देशद्रोही आणि भारतीय घटना अन् न्यायव्यवस्था यांच्यावर टीका करण्याची कृत्ये सतत होत आहेत; परंतु काँग्रेस शासनाकडून याचे समर्थन केले जात होते किंवा त्याकडे कानाडोळा केला जात होता.

२. काँग्रेस आणि डावे यांच्यातील अलिखित करार !

स्वातंत्र्यानंतर काँग्रेस (म्हणजे डावे, रशिया आणि समाजवाद यांच्याकडे ओढा असणारे जवाहरलाल नेहरू) आणि डावे यांच्यात एक अलिखित करार झाला होता, त्यानुसार शैक्षणिक संस्था, शोध संस्था, नाटक आणि चित्रपट या क्षेत्रांत डाव्यांची सत्ता चालेल. या ठिकाणी विस्तार करण्याची त्यांना संधी दिली जाईल. समाजवादी, डाव्या विचारांचे शिक्षक, लेखक, चित्रपटकार यांना या सर्व क्षेत्रांत घुसखोरी करण्याची आणि त्यांना तेथे काम करण्याची संधी दिली जाईल. काँग्रेस यात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही. याबदल्यात डावे काँग्रेसला संसद आणि संसदेच्या बाहेरचे राजनैतिक क्षेत्र यांतील भ्रष्टाचार अन् अनियमितता यांच्याविरोधात काही बोलणार नाहीत किंवा एखाद्या सूत्रात अधिक वाद निर्माण झाला, तर त्याविषयी सौम्यपणेच विचार मांडेल. काँग्रेस आणि डावे यांनी अजूनपर्यंत या अलिखित कराराचे पालन केले आहे. इंदिरा गांधींनी घोेषित  केलेल्या आणिबाणीला ‘अनुशासन पर्व’ असे नाव देऊन डाव्यांनी त्याचे समर्थन केले होते. सुभाषचंद्र बोस यांना तोजोंचे कुत्रे म्हणणार्‍या डाव्यांना संकोच वाटू नये; म्हणून बोस यांच्या धारिकांना (फाईल्स) साठ वर्षांपासून काँग्रेसने दडपून ठेवले होते.

३. डावे आणि देशद्रोही यांना साहाय्य करण्याची काँग्रेसची जुनीच परंपरा !

डाव्यांची विचारधारा चीन, रशिया, क्युबा, व्हिएतनाम यांसारख्या हुकुमशाही आणि साम्यवादी हत्यारी विचारधारा यांचे शासन असणार्‍या देशांतून आयात झाली आहे, त्यामुळे त्यांचा भारतीय लोकशाहीवर जराही विश्‍वास नसणे स्वाभाविकच आहे; परंतु ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे उत्तराधिकार हातात घेतले आहेत, त्या काँग्रेसकडून नरेंद्र मोदी यांच्या द्वेषापोटी देशाला तोडणार्‍या घटकांसमवेत उभे रहाण्याची अपेक्षा देशाच्या जनतेला नव्हती; मात्र तसे झाले. असे पहिल्यांदाच झालेले नाही. २६/११ च्या भयानक आणि भीषण आतंकवादी आक्रमणानंतर ज्या वेळी आपल्या सुरक्षादलाच्या सैनिकांनी शौर्य दाखवत सर्व पाकिस्तानी आतंकवाद्यांना मारले आणि अजमल कसाबसारख्या भयंकर आतंकवाद्याला जिवंत पकडले, त्या वेळी दिग्विजय सिंहांसारखे वरिष्ठ काँग्रेस नेते उघडपणे अजीज बर्नी याच्यासारख्या फुटीरतावादी लेखकाचे ‘२६/११ हल्ला – रा.स्व. संघाचा कट’ या मूर्खतापूर्ण आणि सत्यापासून लांब असणार्‍या पुस्तकाचे प्रकाशन करत होते. काँग्रेसचे नेते, जे सोनिया गांधींची इच्छा आणि आदेश यांशिवाय पाणीपण पिऊ शकत नाहीत, त्या काँग्रेस पक्षात ‘दिग्विजय सिंह यांनी केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन सोनिया आणि राहुल गांधी यांना कल्पना नसतांना झाले असेल’, हे शक्य नाही. त्यानंतर हेच दिग्विजयसिंह दूरचित्रवाणीवर जागतिक आतंकवादी ओसामा बिन लादेन याला ‘ओसामाजी’ म्हणत असल्याचे लक्षात आले. अलीकडच्या माहितीनुसार एका दुसर्‍या वाहिनीवर चालू असलेल्या चर्चासत्रात काँग्रेसचे अन्य वरिष्ठ नेता रणदीप सुरजेवाला यांनी ‘अफजल गुरुजी’ असे संबोधले. या सर्वाचे तात्पर्य असे आहे की, काँग्रेस पक्षाच्या सदस्यांच्या मनात जे आहे, ते त्यांच्या बोलण्यात येतेच आणि असे झाल्यावर सोनिया गांधींचे मौन किंवा त्यांनी कोणतीही कारवाई न करणे, हे कशाचे दर्शक आहे ?

४. काँग्रेसच्या अधिवेशनात ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास विरोध करणार्‍या महंमद अली यांना न रोखणारे मोहनदास गांधींसह काँग्रेसचे इतर नेते !

आपण जर इतिहासावर नजर टाकली, तर असे लक्षात येते की, अशा कितीतरी घटना घडल्या आहेत, ज्यामुळे काँग्रेसचा देशाच्या विरोधात असणारा रोख दिसून येतो, उदा. स्वातंत्र्याच्या आधी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाच्या वेळी ‘वन्दे मातरम्’ म्हटले जात असे; परंतु १९२३ च्या अधिवेशनात काँग्रेसचे नेते पलुसकर ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यासाठी उभे राहिले असतांना काँग्रेसचेच अन्य नेता महंमद अली यांनी, ‘हे गीत इस्लामी सिद्धांताच्या विरोधात असल्याने ते गायले जाऊ नये’, असे सांगून त्याला विरोध केला. ‘परंपरा तोडणार नाही’, असे सांगत पलुसकर यांनी ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत चालूच ठेवले. त्यामुळे मोहंमद अली अधिवेशन सोडून निघून गेले. त्या वेळी महात्मा गांधी यांच्याबरोबर जवळजवळ सर्वच वरिष्ठ काँग्रेस नेते मंचावर उपस्थित होते; परंतु कोणीही पलुसकर किंवा ‘वन्दे मातरम्’ यांना पाठिंबा देण्यासाठी उभे राहिले नाही. त्या वेळी महंमद अली यांना योग्य समज दिली गेली असती, तर त्यानंतर हेडगेवार यांची काँग्रेस पक्षात घुसमट झाली नसती, ते काँग्रेसमधून बाहेर पडले नसते आणि रा.स्व. संघाची निर्मितीही झाली नसती. ‘वन्दे मातरम्’सारख्या संस्कृतनिष्ठ आणि देशप्रेम दर्शवणार्‍या गीताविषयी काँग्रेसची शिथिल पद्धती केवळ आजच चालू नाही, तर धर्मनिरपेक्ष लोकांची मानसिकता इतकी खालच्या दर्जाची झाली आहे की, ‘वन्दे मातरम्’ म्हणणार्‍यांना लगेच संघाचा सदस्य असल्याचे घोषित केले जाते.

५. गोर्‍या कातडीच्या देशी-विदेशी लोकांच्या सल्ल्याप्रमाणे वागून देशाची वाट लावणारी काँग्रेस !

काँग्रेस पक्षाला त्यांच्या अध्यक्षपदासाठी कायम उच्चवर्गीय आणि गोर्‍या साहेबांविषयी प्रेम वाटत आले आहे.

अ. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचे एक उदाहरण म्हणजे लॉर्ड माऊंटबॅटन यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा काही वर्षे भारताच्या गर्व्हनरपदी रहावे, यांसाठी गांधी आणि नेहरू विनंती करत होते.

आ. वर्ष १९४८ मध्ये ज्या वेळी पाकिस्तानने कबाईलियांना पाठवून भारतावर पहिले आक्रमण केले, तेव्हा जवाहरलाल नेहरू यांनी सरदार पटेल, सैन्यातील जनरल करिअप्पा आणि जनरल थिमैय्या यांचा सल्ला धुडकावून देऊन लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या सल्ल्याने ही गोष्ट संयुक्त राष्ट्रांत नेली, ज्याचे परिणाम भारत अजूनही भोगत आहे.

इ. लॉर्ड माऊंटबॅटन यांनी नेहरूंना सांगितले होते की, हैद्राबादचे रझाकार अन् निजाम यांविषयीचे सूत्रसुद्धा संयुक्त राष्ट्रांत मांडा आणि त्यांना स्वत:चा निर्णय घेण्याचा अधिकार द्या. त्या वेळचे गव्हर्नर सी. राजगोपालाचारी यांनी नेहरूंचे ऐकले नाही आणि सरदार पटेल यांच्यातर्फे निजाम आणि दंगा करणार्‍या रझाकारांवर केलेल्या कठोर कारवाईला पूर्ण पाठिंबा दिला.

ई. देशाच्या विरोधातील या गोष्टीची त्या वेळी भारताच्या ईशान्य प्रदेशात पुनरावृत्ती झाली होती. ईशान्येकडील राज्यांची नाजूक युद्ध स्थिती बघून जनरल करिअप्पा यांनी नेहरूंना सल्ला दिला होता की, त्या क्षेत्रात भारताने सुरक्षा सिद्धता, रस्ते, पाणी, वीज, बंधारे यांसारख्या मूळ पायाभूत सुविधांवर अधिक लक्ष दिले पाहिजे; परंतु त्या वेळी नेहरूंना चीनविषयी अधिक प्रेम होते. त्यामुळे त्यांनी ईशान्येकडील राज्यांत अधिक सेना पाठवण्याऐवजी विदेशी मिशनरी वेरियर एल्विन यांचा सल्ला मानत आदिवासी आणि डोंगराळ प्रदेश सैन्याशिवाय ठेवला. त्यामुळे चीनने अरुणाचल प्रदेशाच्या मोठ्या भागावर कब्जा केला. नेहरूंच्या पाठीत सुरा खुपसून भारतासह युद्ध केले आणि संपूर्ण ईशान्येकडील राज्यांत ख्रिस्ती मिशनरींनी त्यांचे जाळे मजबूत केले. काँग्रेसमुळेच आज ईशान्य भागातील काही राज्यांत हिंदु-आदिवासींची संख्या चिंताजनक पातळीपर्यंत अल्प झाली आहे. काही राज्यांत ख्रिस्ती लोकांची संख्या अधिक झाली आहे.

थोडक्यात गोर्‍या कातडीच्या देशी-विदेशी लोकांचे सांगणे ऐकणे, हा काँग्रेसचा आवडता कामधंदा झाला आहे, मग ते माउंटबॅटन असोत किंवा सोनिया माईनो ! वर्ष १८८५ मध्ये ह्यूम नावाच्या एका इंग्रजाने स्थापन केलेल्या काँग्रेसच्या देशाविरुद्धच्या हालचालीचा अंदाज या गोष्टीवरून लावू शकतो की, प्रथम काँग्रेसने सोनिया गांधी यांना पक्षाचे अध्यक्षपद देण्यासाठी मागासवर्गीय श्री. सीताराम केसरी यांना पक्षातून हाकलले आणि दुसर्‍या बाजूला क्वात्रोची नावाच्या इंग्रजाला वाचवण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेता हंसराज भारद्वाज विदेशात जाऊन त्यांचा कायदेशीरपणे बचाव करून आले; परंतु बिहारचे मागासवर्गीय नेता बाबू जगजीवनराम यांना कधीही काँग्रेसचे अध्यक्षपद दिले नाही. विटंबना अशी की, सीताराम केसरी आणि जगजीवनराम यांचा घोर अपमान करणार्‍या काँगे्रसचे युवराज हैद्राबाद येथे रोहित वेमुला याच्या मृत्यूनंतर मगरीचे अश्रू ढाळतात; कारण काँग्रेसचे सख्खे डावे याच उच्चवर्णियांनी ग्रासलेले आहेत. डाव्यांच्या सर्वोच्च पोलिट ब्युरोमध्ये मागासवर्गीयांची संख्या अगदीच नगण्य आहे; परंतु तरी रोहित वेमुला जो एक मागासवर्गीय आहे, त्याला अनुसूचित जाती-जमातीतील बनवून गिधाडांप्रमाणे प्रेतावर टोची मारण्यात डावे सर्वांत पुढे आहेत. देशविरोधी शक्तींना साथ देणे, हे एक मुख्य सूत्र आहेच; परंतु वास्तविकपणे काँग्रेस आणि डावे एक घनघोर उच्चवर्णीय जातीवाद पसरवला आहे. यांची षड्यंत्रे आणि तेजपालसारख्या युवा बलात्कारी पत्रकारामुळे भाजपचे पहिले दलित अध्यक्ष श्री. बंगारू लक्ष्मण यांना खोट्या गोष्टीत फसवले गेले होते.

– श्री. सुरेश चिपळूणकर, लेखक आणि विचारवंत.

(क्रमश:)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now