आयुर्वेदानुसार दैनंदिन जीवनात आचरण करा !

ब्राह्ममुहुर्तावर उठणे : धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार ब्राह्ममुहुर्तावर उठावे. ‘सूर्योदयापूर्वीच्या एका प्रहरात दोन मुहूर्त असतात. त्यांतील पहिल्या मुहुर्ताला ‘ब्राह्ममुहूर्त’ असे म्हणतात. या वेळी मनुष्याची बुद्धी आणि ग्रंथरचनेची शक्ती अतिशय चांगल्या स्वरूपात असते; म्हणून या मुहुर्ताला ‘ब्राह्म’ अशी संज्ञा दिली आहे. दंतधावन करण्यासाठी कडुनिंब, खदिर (खैर), करंज, औदुंबर अशा वृक्षांचे काष्ठ (जाड काडी) वापरावे.

ब्राह्ममुहुर्तावर स्नान करणे : ‘ब्राह्ममुहुर्तावर स्नान करणे, म्हणजे जिवाद्वारे देवपरंपरेचे पालन करणे. ब्राह्ममुहुर्तावर केलेेले स्नान हे ‘देवपरंपरा’ या श्रेणीत येते.

सूर्यनमस्कार : प्रतिदिन सूर्यनमस्कार घातल्याने मनाची एकाग्रता वाढते.

केसांचे पोषण : केसांना तेल लावल्यास त्यांची वाढ चांगली होते.

देवपूजा : धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार देवपूजेचे सर्व विधी करावेत आणि देवाला भावपूर्ण आळवावे.

जेवायला कसे बसावे ? : जेवतांना मांडी घालून बसावे आणि जेवण्यापूर्वी देवाला प्रार्थना करावी, तसेच जेवणानंतर कृतज्ञताही व्यक्त करावी.

कार्यालयात कामे करतांना प्रत्येक काम ठरलेल्या वेळेत आणि  परिपूर्ण करावे, तसेच सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी  ३ ते ६ अशी कामाची वेळ असावी.

झोपणे : पूर्व-पश्‍चिम दिशेने, शक्यतो डाव्या कुशीवर झोपा.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now