वनौषधींचे संवर्धन होणे ही काळाची आवश्यकता !

डॉ. अजयकुमार दस्तुरे

१. लघु वनौषधी उद्यानांची निर्मिती : वनौषधींची ओळख होण्यासाठी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक वनस्पतींची माहिती देणारे एक उद्यान बनवता येईल, तसेच शाळांमधून लहान मुलांना वनौषधींच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देता येईल.

२. वनौषधी लागवडीला प्रोत्साहन : आयुर्वेदीय औषधींच्या लागवडीसाठी अनुदान देऊन औषधांच्या कच्च्या मालाचा पुरवठा वाढवता येईल.

३. वनस्पतींच्या लागवडीविषयी मार्गदर्शन : औषधांची लागवड शास्त्रीय पद्धतीने कशी करावी, यासंदर्भात मार्गदर्शक ग्रंथ, तसेच लघुपट यांची निर्मिती करून शेतकर्‍यांना या विषयाचे प्रशिक्षण देता येईल.

४. नष्टप्राय वनस्पतींचे संवर्धन : ऊतीसंवर्धन (टिश्युकल्चर) सारख्या पद्धतीने नष्टप्राय होत चाललेल्या आयुर्वेदीय वनस्पती संवर्धित करून त्यांची मोठ्या प्रमाणात लागवड करणे आज निकडीचे बनले आहे.

५.  रसायनमुक्त सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन : रसायनमुक्त सेंद्रिय शेतीतून मिळणारे धान्य हे फार मोठे औषध असल्याने अशा प्रकारच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषीमंत्रालयासमवेत प्रयत्न करणे योग्य ठरेल.

– डॉ. अजयकुमार दस्तुरे, वरिष्ठ औषधशास्त्र तज्ञ आणि संचालक, ग्रीन हर्बस्, पुणे आणि वैद्य मेघराज माधव पराडकर, आयुर्वेद आणि गोविज्ञान संशोधक, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now