(म्हणे) ‘भारताची पाकसारखी स्थिती !’ – राहुल गांधी

  • असे सांगणे हे स्वतःची बौद्धिक दिवाळखोरी घोषित केल्यासारखेच आहे !
  • भारतात आज जी बिकट स्थिती उद्भवली आहे, त्याला  काँग्रेसच उत्तरदायी आहे ! त्याविषयी राहुल गांधी प्रायश्‍चित्त घेणार का ?
  • काँग्रेसने केलेल्या मुसलमानांच्या लांगूलचालनामुळे देशात जिहादी आतंकवादी आणि इस्लामी कट्टरतावाद वाढला आहे !
  • देशात आणीबाणी लादणार्‍या काँग्रेसनेच देशात हुकूमशाही राबवली होती, हे जनता विसरलेली नाही !

रायपूर (छत्तीसगड) – देशातील सर्वच संस्थांना भीती दाखवली जात असून न्यायाधीशही घाबरलेले आहेत. रा.स्व. संघाचे लोक या संस्थांवर नियंत्रण मिळवत आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकशाही देशात हे पहिल्यांदाच घडत आहे. अशा गोष्टी केवळ हुकूमशाही राजवटीतच होतात. पाकिस्तानात असे घडते. आफ्रिका आणि इतर विविध देशांतही असे घडते. गेल्या ७० वर्षांत भारतात पहिल्यांदाच हे घडत आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर केली. छत्तीसगड येथील जनस्वराज संमेलनाला ते संबोधित करत होते. बहुमत नसतांना कर्नाटकात भाजपने सरकार स्थापन केले, ही संविधानाची हत्या आहे, असा आरोपही त्यांनी केला.

राहुल गांधी पुढे म्हणाले की,

१. न्यायाधीश आणि प्रसारमाध्यमच नव्हे, तर भाजपच्या खासदारांमध्येही भयाचे वातावरण आहे. ‘आम्ही पंतप्रधानांना घाबरतो’, असे हे खासदार सांगतात. महाराष्ट्रातील एका खासदाराने शेतकर्‍यांचा प्रश्‍न उपस्थित केला, तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

२. शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि अरुण जेटली म्हणतात, ‘शेतकर्‍यांचे कर्ज माफ करणे, हे आमचे धोरण नाही.’ (देशात शेतकर्‍यांच्या सर्वाधिक आत्महत्या काँग्रेसच्याच काळात झाल्या आहेत. त्या वेळी काँग्रेसने त्यांच्यासाठी काय केले ? – संपादक) गेल्या वर्षभरात देशातील सर्वांत श्रीमंत अशा १५ लोकांचे अडीच लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. त्याविषयी जेटली काही बोलत नाहीत.

३. प्रत्येक संस्थेत आणि यंत्रणेत संघाच्या लोकांचा भरणा केला जात आहे. (‘व्यवस्थेत राष्ट्रघातकी आणि हिंदुद्वेषी लोकांचा भरणा असण्याऐवजी राष्ट्रप्रेमींचा भरणा असणे केव्हाही चांगले’, असेच लोकांना वाटत आहे ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now