रमझानच्या पहिल्या दिवशी पाककडून झालेल्या गोळीबारात एक सैनिक घायाळ

एकीकडे रमझानच्या काळात शस्त्रसंधीचे उल्लंघन करणारा इस्लामी देश पाकिस्तान काश्मीरमधील मुसलमानांना शांततेत राहू देत नाही, तर दुसरीकडे भारतीय शासनकर्ते रमझानमध्ये आतंकवाद्यांच्या विरोधात एकतर्फी शस्त्रसंधी करतात !

जम्मू – सांबा आणि कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानी सैन्याने संपूर्ण रात्रभर भारतीय चौक्या अन् रहिवासी भाग यांवर गोळीबार केला, तसेच ‘मोर्टार’ डागले. यात सीमा सुरक्षादलाचा एक सैनिक घायाळ झाला. या वेळी भारतीय सैन्यानेही या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले.