विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वेळी मैदानातच रोनाल्डो आणि मेस्सी यांचा शिरच्छेद करू ! – इस्लामिक स्टेटची धमकी

बगदाद (इराक) – रशियात जून मासापासून फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर इस्लामिक स्टेटने (‘आयएस्’ने) प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) आणि लिओनेल मेस्सी (अर्जेन्टिना) यांचा शिरच्छेद करण्याची धमकी दिली आहे. ‘आयएस्’च्या ‘टेलिग्राम’ या सामाजिक माध्यमावरील एका गटामध्ये या धमकीची चित्रफीत प्रसारित करण्यात आली आहे. ‘हे आक्रमण करण्यासाठी मोठ्या गटाची आवश्यकता नाही. आमचे आक्रमणकर्ते एकेकट्याने आक्रमण करण्यास सक्षम आहेत’, असेही ‘आयएस्’ने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी ‘आयएस्’ने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनाही धमकी दिली होती. त्यात ‘सीरियातील मुसलमानांच्या हत्येचा सूड घेतला जाईल’, अशी धमकी दिली आहे. या धमकीसह त्यांनी एक छायाचित्र प्रसारित केले होते. त्यात ‘रशियातील फुटबॉल मैदानात एक आतंकवादी हातात एके ४७ बंदूक घेऊन उभा आहे’, असे दाखवण्यात आले होते. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना रशियाचा पाठिंबा आहे आणि ‘आयएस्’च्या विरोधातील युद्धात रशिया त्यांना साहाय्य करत आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now