माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याकडून अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे समर्थन

महंमद अली जीना यांचे छायाचित्र लावण्याचे प्रकरण

अलीगड – अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयामध्ये लावण्यात आलेल्या महंमद अली जीना यांच्या छायाचित्रावरून वाद चालू आहे. यात विश्‍वविद्यालयातील विद्यार्थ्यांनी छायाचित्र काढण्यास नकार दिला आहे. त्यांच्या विरोधात देशभक्त संघटनांनी विश्‍वविद्यालयाबाहेर काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्या दिवशी विश्‍वविद्यालयात माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना विश्‍वविद्यालयाचे आजीवन सदस्यत्व देण्यात येण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आंदोलन करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. या मागणीचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी समर्थन करत एका अर्थी जीना यांचे छायाचित्र लावण्याचे समर्थन केले आहे, असे म्हटले जात आहे. (भारताची फाळणी करणार्‍याविषयी प्रेम असणार्‍यांचे समर्थन करून अन्सारी त्यांच्या मनात भारताविषयी काय भावना आहेत, हे लक्षात येते ! अशा व्यक्तींना काँग्रेसने उपराष्ट्रपती बनवले होते, हे लक्षात घ्या ! काही वर्षांपूर्वी २६ जानेवारीच्या प्रजासत्ताकदिनाच्या वेळी ध्वजवंदनाच्या वेळी अन्सारी यांनी मानवंदना दिली नव्हती, असेही समोर आले होते, हे अद्याप भारतीय विसरलेले नाहीत ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now